काेणत्याही घराला हवी सकारात्मक उर्जा

    25-Nov-2020
Total Views |
आपल्या सगळ्यांसाठी घराची परिभाषा एकच असते. घर त्याला म्हणतात, जिथे लाेक एकमेकांशी मिळतं-जुळतं घेऊन राहतात, पण गेल्या काही काळात मला जे अनुभव आले त्यावरून मी ही परिभाषा अजून वाढवू इच्छिताे.
 
/-=_1  H x W: 0
 
जेव्हा मला एखाद्या घरात जाण्याची संधी मिळते, तेव्हा आपसुकच माझे डाेळे त्या तीन गाेष्टींना शाेधतात. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण या तिन्हींपैकी एकही गाेष्ट अशी नाही, जी आपली प्रतिमा आणि भावना यांना प्रतिकूल असेल.पहिल्या गाेष्टीवर मी नजर टाकताे ती म्हणजे, घराच्या बाहेर एखाद्या काेपऱ्यात, लाइटच्या मीटरवर किंवा झाडांच्या शाखांवर चिमणीचं घरटं आहे अथवा नाही. मला ही घरटी खूप आवडतात. यामुळे कच्च्या फरशीवर खूप कमी घाण पसरते, पण पक्क्या फरशीवर खूप अधिक. बहुतांश केसेसमध्ये माझ्या डाेळ्यांना निराशच व्हावं लागतं. जेव्हा मी घराच्या आत म्हणजे ड्राॅइंग रूममध्ये जाताे तेव्हा माझे डाेळे आदेशाशिवाय इकडे-तिकडे काहीतरी शाेधू लागतात. त्यांची अशी इच्छा असते की, त्यांना पुस्तकांनी भरलेलं एक कपाट दिसावं किंवा अशी एखादी जागा दिसावी जिथे काही पुस्तμकं ठेवलेली असतील, याबाबतीतही माझ्या डाेळ्यांचा अनुभव फार काही चांगला नाही. घरामध्ये या दाेन गाेष्टी थाेडावेळ शाेधल्यानंतर माझे डाेळे अनधिकृतरीत्या घराच्या भिंतींचं अस्तित्व शाेधू लागतात.अशा भिंती ज्या असतात, पण दिसत नाहीत. याबाबतीत डाेळ्यांना एवढं दुःखी व्हावं लागतं की जेवढं त्यांना आधीच्या दाेन केसेसमध्ये दुःखी व्हावं लागत नाही.आता मी वळताे की, मी असं का करताे. मला असं वाटतं की, आपल्या घरामध्ये माणसांबराेबरच सकारात्मक ऊर्जाही असायला हवी. चिमण्या तिथेच आपलं घरटं तयार करतात, जिथे त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळते.पुस्तकं सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करतात. तुम्हाला पुस्तकांच्या दुकानाच्या बाहेर जाऊन काही वेगळं वाटत नाही का? खराब संबंधांच्या अदृश्य भिंती घराच्या आत सकारात्मक ऊर्जेचं आगमन राेखतातच, त्याचबराेबर नकारात्मक ऊर्जा निर्माण करून सकारात्मक ऊर्जेचा दर्जाही घटवतात. मला असं वाटतं की, जर घर आहे तर सकारात्मक ऊर्जाही असायलाच हवी.