लक्षाधीश हाेण्याचा राजमार्ग

21 Nov 2020 11:56:56
तुम्हाला चांगल्या परताव्याची अपेक्षा असेल तर जेवढी जास्त काळ तुम्ही गुंतवणूक कराल तेवढाच चांगला परतावा तुम्हाला म्युच्युअल फंडातून मिळेल यात शंका नाही.
 
17/_1  H x W: 0
 
गुंतवणूक करण्याआधी ती काेणत्या हेतूने करीत आहाेत याची ज्याला माहिती असते त्याची गुंतवणूक नेहमी याेग्य प्रकारे हाेते असे म्हटले जाते. यासाठी सर्वप्रथम गुंतवणूकीचे आपले कमी कालावाधीचे व दीर्घ काळानंतरची उद्दीष्टे निश्चित केली पाहिजेत. ती एकदा कागदावर उतरवली पाहिजेत. त्या नुसारच गुंतावणुकीचा पर्याय निवडावा असे अर्थतज्ञ सांगतात. समजा तुम्ही यासाठी म्युच्यअल फंडात गुंतवणूक करणार असाल तर ती किमान पाच वर्षे तरी करावी. गुंतवणुकीसाठी दिलेली ही काही माेठी वेळ नाही. जर आपण म्युच्युअल फंड चा ऐतिहासिक परतावा पहिला तर गुंतवणूकदारांचे पैसे हे दुप्पट ही झालेले आहेत. पण काेणत्याही फंडामध्ये पैसे गुंतवणूक करून असा परतावा मिळणे अपेक्षित नाही आहे त्यासाठी फंडाची निवडही तशीच करणे आवश्यक आहे. आपण आपल्या गुंतवणुकीला जितका जास्त वेळ देऊ तेवढा चांगला परतावा आपल्याला आपल्या गुंतवणुकीतुन नक्कीच मिळेल फक्त गुंतवणूक करताना याेग्य सल्लागाराचा सल्लाही तितकाच महत्वाचा आहे. नेहमी एसआयपी द्वारे आपण आपल्या गुंतवणुकीला सुरुवात करावी जिथे आपल्या छाेट्याश्या गुंतवणुकीतून दीर्घ कालावधीमध्ये चांगला परतावा मिळणे अपेक्षित आहे. जर आपण दर महा दहा हजार रुपयांची एसआयपी पुढील पाच वर्षांसाठी केली आणि आपण अपेशित परतावा बारा टक्के घेतला तरी आपली गुंतवणूक सहा लाख रुपयांची असेल आणि आपल्या गुंतवणुकीची मार्केट रक्कम ही सव्वा आठ लाख रुपये असेल आणि पंधरा टक्के परतावा मिळाला तर ती जवळपास नउ लाख असेल .आता आपण या रकमेत नवीन गुंतवणूक न करता जर ती रक्कम तशीच पुढील पाच वर्षांसाठी गुंतवून ठेवल्यास आणि अपेक्षित परतावा पंधरा टक्के मिळाल्यास हीच रक्कम तब्बल अठरा लाखांपेक्षा जास्त हाेवू शकते. जर आपण हीच एसआयपी 18 वर्षे तशीच सुरू ठेवली तर आपल्याला आपल्या गुंतवणुकीतून एक काेटीपेक्षा जास्त परतावा मिळेल.चांगल्या परताव्याची अपेक्षा असेल तर जेवढे जास्त काळ तुम्ही गुंतवणूक कराल तेवढाच चांगला परतावा तुम्हाला म्युच्युअल फंडातून मिळेल यात शंका नाही.
 
Powered By Sangraha 9.0