मुंबई, 20 नाेव्हेंबर (आ.प्र.) : आपल्या मुलाने गायक हाेऊ नये आणि झाल्यास भारतात काम करू नये, असं बाॅलिवूडचा सुप्रसिद्ध गायक साेनू निगमने म्हटलं आहे. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत ते बाेलत हाेते. काही दिवसांपूर्वी साेनू निगमचं ‘ईश्वर का सच्चा बंदा’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याच्या प्रमाेशन दरम्यान साेनू निगमने एका वेबसाइटला मुलाखत दिली. या वेळी साेनू निगमने हे व्नतव्य केले. एका प्रसिद्ध इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत साेनू निगमने आपल्या मुलाच्या करिअरबाबतच्या निर्णयाचा खुलासा केला. खरं सांगायचं तर त्याने व्यावसायिक गायक हाेऊ नये, अशी माझी इच्छा आहे. आणि व्हायचेच असेल, तर त्याने भारतात काम करू नये असं मला वाटतं, असं साेनू म्हणाला.