नव्या 61 प्रकारांमधून निवडा वाॅलपेपर

    21-Nov-2020
Total Views |

nm,._1  H x W:
 
देशातील सर्वाधिक लाेकप्रिय आणि यशस्वी अ‍ॅप म्हणून ओळखले जाणारे ‘व्हाॅट्सअ‍ॅप’ दर काही दिवसांनी आपल्या युजर्ससाठी नवनवी फीचर्स आणत असते. आता व्हाॅट्सअ‍ॅपने नेहमीप्रमाणेच अ‍ॅप अपग्रेड केले आहे. यामध्ये नव्या 61 वाॅलपेपर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे युजर्सना चॅटिंग करताना वेगळे आणि नवे वाटू शकते.व्हाॅट्सअ‍ॅपने सध्या आपल्या बीटा युजर्ससाठी ही ताजी वाॅलपेपर आणली आहेत.आपल्या नव्या फीचर्ससंबंधात व्हाॅट्सअ‍ॅप बीटा इन्फाेने नुकतीच नवी माहिती प्रसिद्ध केली आहे. या माहितीनुसार, अँड्राॅइड बीटा युजर्ससाठी व्हाॅट्सअ‍ॅपने अ‍ॅडव्हान्स्ड वाॅलपेपर नावाचे फीचर लाँच केले आहे. युजर्स आपल्याला आवडेल अशा पद्धतीने चॅटिंगच्या बॅकग्राउंडचे वाॅलपेपर बदलू शकतात.आता यासाठी त्यांना 61 नव्या वाॅलपेपर्सचे पर्याय मिळू शकतील. व्हाॅट्सअ‍ॅप बीटा इन्फाेने वाॅलपेपर्सच्या डिझाइनची यादी ट्विटरवर प्रसिद्ध केली आहे. या ट्विटमध्ये नवे वाॅलपेपर कसे दिसतात हेही पाहता येईल. यातील विशेष गाेष्ट म्हणजे, युजर्स वाॅलपेपरच्या ‘ओपेसीटी’मध्येदेखील बदल करू शकतात.नव्या 61 वाॅलपेपर्समध्ये वेगवेगळे प्रकार पाहावयास मिळतात. युजर्सना 32 नवे ब्राइट वाॅलपेपर्स, 29 नवे डार्क वाॅलपेपर्स, कस्टम वाॅलपेपर आणि साॅलिड कलरमधून आवडेल ते निवडू शकतात. आपण जुना वाॅलपेपर निवडला तर आपल्या व्हाॅट्सअ‍ॅप अर्काइव्ह हा पर्याय निवडता येईल. जर आपल्याला साॅलिड रंगांना नव्या वाॅलपेपरप्रमाणे सेट करायची इच्छा असेल, तर आपल्याला ते व्हाॅट्सअ‍ॅप डुडलवर नेता येऊ शकेल. व्हाॅट्सअ‍ॅप बीटा इन्फाेने सांगितल्यानुसार, सध्या हे फीचर बीटा युजर्ससाठी असले, तरी लवकरच याला स्टेबल व्हर्जनमध्ये सर्वांसाठी लाँच करण्यात येणार आहे.