लंडन, 19 नाेव्हेंबर (वि.प्र.) : इंग्लंडमध्ये 2030 पासून डिझेलपेट्राेलच्या विक्रीवर बंदी घालण्याची घाेषणा इंग्लंडचे पंतप्रधान बाेरीस जाॅन्सन पुढच्या आठवड्यात करणार आहेत.यापूर्वी 2035 पासून बंदी घालण्यात येणार हाेती. पण आता 5 वर्षे अगाेदरच ही बंदी घालण्यात येणार आहे.ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन कमी करण्यासाठी सन 2040 पासून डिझेल पेट्राेलवर चालणाऱ्या कार विक्रीवरही बंदी घालण्यात येणार हाेती. परंतु फेब्रुवारी 2020 मध्ये पंतप्रधान बाेरीस जाॅन्सन यांनी ही बंदी 2035 पासूनच लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठवड्यात बाेरीस जाॅन्सन इंग्लंडचे पर्यावरण धाेरण जाहीर करणार आहेत.त्याचवेळी ही घाेषणा सुद्धा करतील.
अशी चर्चा आहे. या संदर्भात टेन डाऊनिंग स्ट्रिटच्या प्रवक्त्याने काेणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.