बेनझीर कन्येच्या लग्नात सेलफाेन बंदी

    21-Nov-2020
Total Views |
 
nhj_1  H x W: 0
 
कराची, 20 नाेव्हेंबर (वि.प्र.) : पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टाे व माजी राष्ट्रपती असीफ जरदारी यांची कन्या बख्तावत भुट्टाे झरदारी हिचा साखरपुडा 27 नाेव्हेंबर राेजी बिलावत हाउसमध्ये साजरा हाेत असून, त्यासाठी निमंत्रणे रवाना झाली आहेत. विशेष म्हणजे निमंत्रितांना या कार्यक्रमाला उपस्थित राहताना अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे असे समजते.
यातील पहिला नियम म्हणजे पाहुणे बिलावल हाउसमध्ये माेबाइल नेऊ शकणार नाहीत. त्यांना गेटवरच माेबाइल ठेवून आत प्रवेश करता येईल. दुसरे म्हणजे कुणीही निमंत्रित बिलावल हाउसमध्ये एकमेकांचे अथवा समारंभाचे फाेटाे काढू शकणार नाहीत किंवा व्हिडीओ शूटिंग करू शकणार नाहीत. घरातील स्टाफ फाेटाे काढून नंतर ते पाहुण्यांना देणार आहेत. साखरपुड्याच्या अगाेदर प्रत्येक निमंत्रितांनी एक दिवस आधी काेराेना टेस्ट करून घ्यायची असून, त्याचा रिपाेर्ट पाठवायचा आहे. ज्यांचा रिपाेर्ट निगेटिव्ह आहे अशांनाच कार्यक्रमाला प्रवेश दिला जाणार आहे.बख्तावतचा साखरपुडा अमेरिकेतील व्यावसायिक युनूस चाैधरी यांचा मुलगा मेहमूद यांच्याबराेबर हाेत आहे. हे कुटुंब अमेरिकेचे रहिवासी आहे. बख्तावतने पाकिस्तानमध्ये अनेक जुन्या प्रथांविरुद्ध आवाज उठविला आहे. रमजानमध्ये राेजा पाळताना तहान लागल्यास पाणी पिणे हा गुन्हा असून, त्यासाठी शिक्षा दिली जाते. बख्तावतने या प्रथेविरुद्ध आवाज उठविताना दहशतवादी खुलेआम फिरतात आणि लाेकांना मात्र शिक्षा दिली जाते असे विधान केले हाेते. तिला अनेकदा जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या आहेत, असे समजते.