सर्वांत जास्त लांबीची नाईल नदी

    21-Nov-2020
Total Views |
 
m,kk_1  H x W:
 
रवांडा आणि बुरुंडीमधल्या दुर्गम डाेंगराळ भागात व्हाइट नाईल नदीचा उगम हाेताे. नंतर लेक व्हिक्टाेरियातून ही नदी उत्तर दिशेला वाहात जाते. 6650 किलाेमीटर इतक्या अवाढव्य लांबीची ही नदी इजिप्त आणि सुदान या दाेन देशांमधून वाहते. कैराे, खारटूम, जिंजा आणि जुबा ही या नदीच्या किनारी वसलेली माेठी शहरे आहेत. इथिओपियात लेक टानामध्ये उगम पावणारी ब्लू नाईल हंगामात प्रचंड पाणी आणि गाळ वाहून आणते. त्यामुळेच ही नदीसुध्दा नाईलचं मातृत्व स्वतःकडे विभागून घेते! नाईलची लांबी सुमारे 6650 किलाेमीटर आणि ती (बहुधा) जगातली सगळ्यात जास्त लांबी असलेली नदी आहे. यासाठी मात्र सगळ्यात दूर असलेलं व्हाईट नाईलचं उगमस्थान गृहीत धरलं जातं! इजिप्त या देशाचं अस्तित्वच मुळी नाईल नदीमुळे आहे. इतकं की इजिप्तला नाईलची देणगी म्हणतात! नाहीतर उत्तर आफ्रिकेच्या वैराण सहारा वाळवंटात इतकी हिरवाई कुठून येणार? याच नाईलच्या खालच्या भागात (म्हणजे उत्तर दिशेच्या त्रिभुज प्रदेशात) इजिप्तची जुनी संस्कृती बहरली. पिरॅमिड, स्फिंक्स वगैरे अजस्त्र बांधकामं याच भागातली. नाईलच्या थाेडं वरच्या (म्हणजे दक्षिणेच्या) भागात कालांतराने इजिप्तची नवी संस्कृती बहरली. वेगवेगळ्या फॅराेहची (म्हणजे इजिप्शियन राजांची) थडगी याच राजवटीत बांधली गेली.