मनुष्यात शरीर, मन, त्याच्या भावना आणि जीवन ऊर्जा आहेत. या चारींपैकी काेणत्याही वापरून त्याच्यातील सीमित मर्यादा पार करून जाऊ शकताे.

आपली जीवनशैली काेणत्याही प्रश्नांची उत्तरे देत नाही. त्याऐवजी, आत्ता आपल्या आकलनात नसलेले सर्व आयाम जाणून घेण्यासाठी ती आपल्याला पद्धती आणि साधने देऊ करते. ज्या गाेष्टींचे आकलन तुम्हाला हाेते केवळ तेच तुम्ही जाणता.राहिलेले सर्वकाही फक्त एक मानसिक प्रक्रिया आहे आणि कधीही बदलू शकते.मानसिक रचना ही तुमची काल्पनिक घडवणूक आहे आणि तिचे वास्तवाशी काही देणेघेणे नाही, कारण तुम्हाला हवे त्याची तुम्ही कल्पना करू शकता आणि ते करण्यापासून काहीही तुम्हाला थांबवू शकत नाही. वास्तविक सृष्टी ही काल्पनिक मानसिक रचनेपेक्षा विशाल आणि महाकाय आहे. म्हणून जर तुमच्यात सत्य जाणण्याची तीव्र उत्कंठा असल्यास तुमचे आकलन वृद्धिंगत करण्यासाठी एक पद्धत तुम्हाला दिली जाऊ शकते, जेणेकरून तुमच्या स्वानुभवाने तुम्हाला त्याची प्रचिती येईल.मानसिक कल्पित रचनेतून विश्वास प्रणाली वाढीस लागतात जे माणसांना एक प्रकारचे सांत्वन देतात. हे एक उत्तम मानसाेपचार साधन आहे. परंतु भारतासारख्या पूर्वे कडील संस्कृती सांत्वन शाेधत नाहीत.त्या उपाय शाेधत असतात. त्यांचे एकमेव ध्येय नेहमी माेक्ष किंवा मुक्ती राहिले आहे.एका मनुष्यात शरीर, मन, त्याच्या भावना आणि त्याची जीवन ऊर्जा आहेत. या चारींपैकी काेणत्याही वापरून त्याच्यातील सीमित मर्यादा पार करून जाऊ शकताे.आपल्या जीवनशैलीत या चारही पैलूंचा वापर परमार्थ प्राप्तीसाठी केला गेला. तुम्ही तुमची बुद्धी वापरून एक ज्ञानयाेगी हाेऊ शकता. तुम्ही तुमची भक्ती किंवा भावना वापरून भक्तीयाेगी हाेऊ शकता. शारीरिक कार्य-कृतींचा वापर करून तुम्ही परम मुक्ती प्राप्त करू शकता, याला आपण कर्मयाेग असे म्हणताे. किंवा तुमच्या आंतरिक जीवन ऊर्जेचे रूपांतर करून तुम्ही परममुक्ती प्राप्त करू शकता, ज्याला क्रियायाेग असे म्हणतात. हा वैश्विक धर्म आहे. तुम्ही काेण आहात याने काहीच फरक पडत नाही, तुम्ही फक्त हे चारच पैलू वापरू शकता.इतर आणखी काहीही वापरू शकत नाही.