एक सेमिनार चालू हाेतं. शहरातील प्रसिद्ध मॅनेजमेंट गुरू जवळजवळ 200 लाेकांना संबाेधित करत हाेते. त्यांनी 2000 रुपयांची नाेट हवेत उडवली आणि विचारलं ही काेणाला हवी आहे? अनेकांनी हात वर केले.त्यानंतर त्यांनी नाेट जमिनीवर फेकली. ते म्हणाले, थाेडी प्रतीक्षा करा. त्यानंतर त्यांनी ती नाेट ताेडायला माेडायला सुरुवात केली.काही वेळानंतर ते पुन्हा ती नाेट दाखवत म्हणाले, आता ही नाेट काेणाला हवी आहे? पुन्हा अनेकांनी हात वर केले. त्यानंतर त्यांनी ती नाेट जमिनीवर फेकली. ती आपल्या बुटांनी चिरडू लागले. नंतर ती नाेट उचलून म्हणाले, ही काेण घेणार? तरीही अनेकांनी हात वर केले.माझ्या मित्रांनाे मला एक गाेष्ट कळत नाही, मी त्या नाेटेला काहीही केलं तरी सुद्धा तुम्ही ती घेण्यास तयार आहात? असं यासाठी कारण तुम्ही जाणता की काहीही केल्याने त्याची किंमत कमी हाेत नाही.त्याची किंमत पहिले सुद्धा 2000 हाेती आणि आता सुद्धा. जीवनात कितीदा आपण पडताे, हरताे, जखमा हाेतात, परिस्थिती ताेडते. आपल्या केलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे आपण जमिनीवर येताे. कित्येकदा असंही वाटतं की, आपला काहीच उपयाेग नाही.परंतु वास्तव तर हे आहे की, काेणत्याही परिस्थितीत आणि काहीही झालं तरी, जे लाेक तुमच्यावर प्रेम करतात, त्यांच्यासाठी आपण तेच असताे, जे आधी असताे. आपली किंमत यावर अवलंबून नाही की, आपण काय करताे, काेणत्या लाेकांना ओळखता? आपली किंमत यावरून ठरते की, आपण काय आहाेत? आपण काय आहाेत, आणि सर्वांत महत्त्वाचे हेच आणि की तुम्ही खास आहात.