आराेग्य परवाना नूतनीकरणासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

21 Nov 2020 11:15:34
केवळ आराेग्य परवाना फी व विलंब फी भरून परवाने मिळणे शक्य
 
ब्न्ह्य._1  H x
 
पुणे, 20 नाेव्हेंबर (आज का आनंद न्यूज नेटवर्क, पुणे) : काेराेनामुळे पुकारण्यात आलेल्या लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेकांना आपले आराेग्य परवाने नूतनीकरण करणे शक्य झाले नसल्याने, पुणे महापालिकेने संबंधितांना आराेग्य परवाना नूतनीकरणासाठी 31 डिसेंबर, 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे प्रचलित कार्यपद्धतीनुसार तडजाेड फीची आकारणी न करता, केवळ आराेग्य परवाना फी व विलंब फी भरून आता परवाना नूतनीकरण करता येणार आहे पुणे महापालिकेच्या सहायक आराेग्य प्रमुख डाॅ. मनीषा नाईक यांनी याबाबत माहिती दिली सन 2020-21 या आर्थिक वर्षात पुणे महापालिकेने आराेग्य परवाना नूतनीकरण शुल्कापाेटी 1 काेटी 30 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित धरले आहे यापैकी 30 सप्टेंबर, 2020 पर्यंत केवळ 29 लाख 55 हजार रुपये जमा झाले आहेत वर्षभरात साधारणत: 1 हजार 976 आराेग्य परवाने घेतले जातात, यापैकी सप्टेंबरपर्यंत केवळ 225 जणांनी परवाना नूतनीकरण केले आहे काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मार्च, 2020 पासून लाॅकडाऊन केल्यामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले हाेते यामध्ये आराेग्य परवाना आवश्यक असलेल्या लाॅज, मंगल कार्यालये, सलून, ब्युटीपार्लर, अंडीविक्री, धान्यभट्टी, आइस फॅक्टरी, कातडीसाठा, पानपट्टी, रसगुऱ्हाळ, घरगुती वापरासाठी पाळीव जनावरे, खाजगी जनावरे, घाेडा व्यावसायिक यांचा समावेश हाेताे शहरात अशांची साधारण संख्या 1 हजार 976 आहे यापैकी परवाना नूतनीकरण न केलेल्या 1 हजार 751 जणांना महापालिकेच्या या मुदतवाढीचा लाभ मिळणार आहे 31 डिसेंबरपर्यंत परवाना नूतनीकरण न केल्यास संबंधितांना प्रचलित कार्यपद्धतीनुसार पुढे आराेग्य फीच्या 100 टक्के तडजाेड फीची आकारणी करण्यात येणार असल्याचेही आराेग्य विभागाने स्पष्ट केले आहे 
Powered By Sangraha 9.0