नक्षलग्रस्त भागात गृहमंत्र्यांची दिवाळी

    21-Nov-2020
Total Views |

mki_1  H x W: 0 
 
गडचिराेली, 20 नाेव्हेंबर (आ.प्र.) : नक्षलवाद्यांविराेधात लढणाऱ्या गडचिराेली जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागाला दिवाळीनिमित्त सपत्नीक भेट देऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पाेलिस, जवानांची उमेद वाढवली. गडचिराेलीपासून तीनशे कि.मी.वर असलेल्या पातागुडमला देशमुख यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भेट देऊन जवानांसाेबत दिवाळी साजरी केली.दिवाळीच्या निमित्ताने पहिल्यांदाच गृहमंत्री गडचिराेलीत येत असल्याने पाेलिसांमध्ये उत्साहाचे वातावरण हाेते. गृहमंत्र्यांनी तेथील पाेलिसांशी संवाद साधून त्यांच्यासाेबत फराळही केला. नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पाेलिसांच्या कुटुंबीयांची आस्थेने चाैकशी केली. या भागात दाैंड आणि काेल्हापूरमधील राज्य राखीव पाेलिस दलाच्या तुकड्या कार्यरत आहेत.त्यांचे गृहमंत्र्यांनी विशेष काैतुक केले.
1यगडचिराेलीतील अत्यंत दुर्गम आणि टेकड्यांचा प्रदेश असलेल्या पातागुडम येथे देशमुख यांनी दिलेल्या ऐतिहासिक भेटीने पाेलिस कर्मचारी भारावून गेले.तेथील महिला पाेलिस कर्मचाऱ्यांची देशमुख यांनी आस्थेने विचारपूस केली.त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. गडचिराेली पाेलिस मुख्यालयापासून तीनशे कि.मी.वर छत्तीसगढ सीमेलगत इंद्रावती नदीकाठी पातागुडम पाेलिस चाैकी आहे. देशातील ही सर्वांत दुर्गम चाैकी मानली जाते.