घराची शाेभा वाढविणारे पडद

    21-Nov-2020
Total Views |
भारदस्तपणा आणि साैंदर्याची आवड असणाऱ्यांनी काॅटनच्या पडद्यांचा विचार करावा. असे पडदे घर आणि ऑफिस दाेन्हीमध्ये उठून दिसतात.
 
nmui_1  H x W:
 
घरातल्या खिडक्यांचं साैंदर्य खुलतं ते पडद्यांमुळे. पडद्यांमुळे प्रायव्हसीही जपली जाते. पडदे घेताना रंगसंगती महत्त्वाची असते. घराच्या आतल्या भिंतींचे रंग लक्षात ठेवून किंवा संपूर्ण घराला एकाच रंगाची छटा असेल, तर सर्वच पडदे त्या रंगाशी मॅच हाेणारे निवडावेत. रूमचा रंग गडद असेल, तर तशाच गडद छटेचा पडदा असू नये. फिकट छटेतला पडदा निवडावा. केन फर्निचर किंवा वूड फिनिशचं फर्निचर असेल, तर काॅण्ट्रास्ट मॅचिंग साधल्यास सुंदर दिसेल. पडद्याचं कापड एकदा ठरलं की त्याची स्टाइल ठरवावा. उदाः अमेरिकन प्लिट्स, बंध असणारे, चुण्यांचे आदी.पडद्यांची लांबी फ्लाेअरिंगच्या स्कर्टिंगपर्यंतच ठेवावी. म्हणजे साफसफाईच्या वेळी ते खालच्या बाजूनं खराब हाेणार नाहीत. काॅटन, नेट, हँडलूम, एम्बाॅस, लेस, नीटिंग वगैरे प्रकारातले पडदे छान दिसतात.पाॅलिएस्टरमध्येही पडद्यांसाठी कापड उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, पाॅलिएस्टर पडद्यांची फार देखभाल करावी लागत नाही. पावसाळ्यात पटकन सुकतात तसंच त्यांना इस्त्रीचीही गरज नसते आणि त्यांचे रंगही लवकर फिके पडत नाहीत. भारदस्तपणा आणि साैंदर्याची आवड असणाऱ्यांनी काॅटनच्या पडद्यांचा विचार करावा.असे पडदे घर आणि ऑफिस दाेन्हीमध्ये उठून दिसतात. प्लेन किंवा सेल्फ डिझाइनला वेगळा पर्याय म्हणून चेक्स किंवा स्ट्राइप्सच्या पडद्यांनी घराला स्टायलिश आणि ट्रेंडी लूक आणता येऊ शकताे. क्रिएटिव्हिटी आणि साैंदर्यावर भर असेल, तर सिल्कमध्ये आकर्षक डिझाइन्स आणि रंग निवडता येतील. या पडद्यांची वैशिष्ट्यं म्हणजे, ते अत्यंत तलम, मखमली स्पर्शाचे आणि अँटिक लूक देणारे असतात. पडद्याचं आयुष्य वाढवण्यासाठी त्याला अस्तर लावावं.आधुनिक फॅशनपेक्षा तुमच्या गरजेला प्राधान्य द्या, पडद्यांचं कापड टिकाऊ असावं. इंटिरिअर करताना पडदे इतर गाेष्टींना शाेभतील असे निवडाकाॅटनचे पडदे दीर्घकाळ टिकतात.