अन् माजी मंत्र्याने खाल्ला कच्चा मासा

    21-Nov-2020
Total Views |

nm,o_1  H x W:
 
काेलंबाे, 20 नाेव्हेंबर (वि.प्र.) : साथीच्या फटक्यामुळे मासे खाण्याचे प्रमाण कमी हाेऊन मच्छीमार व्यावसायिक अडचणीत सापडल्याने श्रीलंकेच्या एका माजी मंत्र्याने भलतीच शक्कल लढवली. त्याने चक्क एक न भाजलेला मासा गिळून दाखवला, ज्यामुळे लाेक पुन्हा मासे खाऊ लागतील आणि व्यवसायाला चालना मिळेल.दिलीप वेदराची असे या माजी मंत्र्याचे नाव असून, त्यांच्याकडे याआधी मत्स्याेद्याेग खाते हाेते. त्यांनी एक मासा विकत घेतला आणि चक्क पत्रकार परिषदेत ताे खाऊन दाखवला.