धार्मिक स्थळांच्या भेटीसाठी एसटीच्या फेऱ्या वाढल्या

    21-Nov-2020
Total Views |
 
m,._1  H x W: 0
 
पुणे, 20 नाेव्हेंबर (आ.प्र.) ः राज्य शासनाने दिवाळी पाडव्यापासून मंदिरे खुली केली. त्यामुळे गेल्या साडेसात महिन्यांपासून देवदर्शनाची आस लावून बसलेल्या भाविकांना आनंद झाला. परिणामी, देवदर्शनाला जाण्यासाठी प्रवाशांकडून एसटीला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे धार्मिक स्थळांच्या एसटीच्या फेऱ्या वाढल्या आहेत.शिर्डी, पंढरपूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, तुळजापूर, काेल्हापूर यासारख्या विविध ठिकाणच्या धार्मिक स्थळांना नागरिक भेट देऊ लागले आहेत.दिवाळीनिमित्त सुट्या काढून नागरिक प्रवासाला निघाले आहेत. त्यामुळे दहा ते बारा गाड्यांचे जादाचे नियाेजन वेगवेगळ्या धार्मिक स्थळांसाठी करावे लागत आहे. अशी माहिती महामंडळाच्या पुणे विभागाचे वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर रणवरे यांनी दिली. रणवरे म्हणाले की, एसटीची आरक्षणेही वाढली आहेत. लाॅकडाऊन शिथिल केल्यानंतर सुरुवातीला तीस टक्के प्रवासी एसटीने प्रवास करत हाेते. आता सत्तर टक्के प्रवासी एसटीने प्रवास करत आहेत.त्यामुळे एसटीच्या फेऱ्याही वाढू लागल्या आहेत. मंदिरे खुली करण्याची घाेषणा झाल्यावर आरक्षणांतही वाढ हाेऊ लागली. साहजिकच त्याचा लाभ एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी निश्चित हाेत आहे.