विषुववृत्तीय प्रदेशाची माहिती

    20-Nov-2020
Total Views |

25_1  H x W: 0  
 
विषुववृत्तात येतात ते विषुववृत्तीय प्रदेश.विषुववृत्ताच्या उत्तरेस 5 अंश व दक्षिणेस 5 अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान विषुववृत्तीय प्रदेश आहे. दक्षिण अमेरिकेतील अ‍ॅमेझाेन नदीचे खाेरे, आफ्रिकेतील कांगाे नदीचे खाेरे, गिनीचा किनारा आणि आग्नेय आशियातील मलेशिया, इंडाेनेशिया, सिंगापूर यांचा विषुववृत्तीय प्रदेशात समावेश हाेताे. विषुववृत्तीय प्रदेशात सूर्यकिरणे लंबरूप पडतात, त्यामुळे या प्रदेशात जास्त उष्णता असते. येथील सरासरी तापमान 27 अंश सेल्सियस असते. येथील हवामान वनस्पतीवाढीस अनुकूल असल्यामुळे या प्रदेशात अतिशय दाट वने आहेत. त्यांना सदाहरित वने असे म्हणतात.महाेगनी, ग्रीनहार्ट, राेजवूड, एबनी, सिंकाेना, रबर, नारळ, काेकाे, ताड इत्याची झाडांचे प्रकार इथे आढळतात. दक्षिण अमेरिकेत सदाहरित वनांना सेल्व्हाज असे म्हणले जाते.
जगातील सर्वाधिक दाट सदाहरित वने ब्राझील या देशात आहेत. विषुववृत्तीय प्रदेशात लाेकवस्ती कमी आहे. कांगाेच्या खाेऱ्यात पिग्मी लाेक, अ‍ॅमेझाेन नदीच्या खाेऱ्यातील बाेराे इंडियन लाेक तर मलेशियातील लाेक सेमँग नावाने ओळखले जातात.