कल्याण स्थानकात रात्रीही काेराेना तपासणी

    20-Nov-2020
Total Views |
महापालिका प्रशासनाचा निर्णय : प्रत्येक प्रवाशाची घेतली जाणार चाचणी
 
m,lk_1  H x W:
 
कल्याण, 19 नाेव्हेंबर (आ.प्र.) : कल्याण-डाेंबिवली महापालिका क्षेत्रातील काेराेनाबाधितांची संख्या कमी हाेत असली, तरी शासनाने दुसऱ्या लाटेची शक्यता व्य्नत केल्यामुळे पालिका प्रशासनाकडून याेग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कल्याण हे मध्य रेल्वेचे मुख्य जंक्शन असल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या माेठी आहे.यामुळेच या प्रवाशांच्या तपासणीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. रात्री स्थानकात येणाऱ्या मेल, एक्स्प्रेसची संख्या माेठी असल्यामुळे आता कल्याण रेल्वे स्थानकात रात्रीही काेराेना चाचणी सुविधा सुरू करण्यात आली आहे. रात्री 10 ते पहाटे 5 या वेळात हे केंद्र सुरू राहणार असून, येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तेथे तपासणी केली जाणार आहे.कल्याण हे मध्य रेल्वेचे पहिले जंक्शन असून, बाहेरून येणाऱ्या मेल, एक्स्प्रेस गाड्यांतून येणाऱ्या प्रवाशांची संख्या माेठी असते. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमुळे शहरातील कमी हाेत असलेली रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याची शक्यता असून, ते टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने चाचण्या वाढवण्यावर भर दिला आहे. कल्याणबाहेरून येणाऱ्या प्रवाशांची स्थानकातच तपासणी करून या प्रवाशांना शहरात प्रवेश दिला जाणार असून, काेराेनासदृश लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना तातडीने उपचारांसाठी धाडले जाणार आहे.
दरम्यान, डाेंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय नाॅन काेविड रुग्णालय केल्यानंतर आता कल्याण पश्चिमेकडील वसंत व्हॅलीतील काेराेना केंद्रात माेफत अँटिजेन चाचण्या, तसेच बाह्यरुग्ण तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. ज्या रुग्णांना सर्दी, ताप, खाेकल्यासारखी लक्षणे असतील, त्यांनी सकाळी 9 ते दुपारी 1 या काळात तपासणी केंद्रात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आराेग्य विभागाने केले आहे. त्याचबराेबर पालिका प्रशासनाने काेराेनामु्नत रुग्णांसाठी महाजनवाडी सभागृहात सुरू केलेल्या पाेस्ट काेराेना केंद्राला चांगला प्रतिसाद मिळताे आहे.