मुंबई, 19 नाेव्हेंबर (आ.प्र.) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात सहकारातून समृद्धीकडे या विषयावर सहकार आयु्नत व निबंधक, सहकारी संस्था, पुणेचे अनिल कवडे यांची विशेष मुलाखत प्रसारित हाेणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवारी (20 नाेव्हेंबर) सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित हाेईल. तसेच, न्यूज ऑन एअर (newsonair) या अॅपवर याच वेळेत ही मुलाखत ऐकता येईल. निवेदिका डाॅ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे. सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय, 14 ते 20 या कालावधीतील राष्ट्रीय सहकारी सप्ताह व त्याची अंमलबजावणी, सहकार चळवळीची एकंदरीत वाटचाल, राज्यातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत सहकारी संस्थांचे याेगदान, अशा विविध मुद्द्यांवर सविस्तर माहिती अनिल कवडे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.