जंक फूडला समजून घेताना

    20-Nov-2020
Total Views |
 
m,k_1  H x W: 0
 
र्क्षीपज्ञ अर्थात जंक ह्या शब्दाचा डिक्शनरीमध्ये तुम्ही अर्थ पाहिला तर ताे आहे ‘निराेपयाेगी वस्तू’, ‘भंगार’ तर असा अर्थ असलेले जे अन्न आहे ते जंक फूड म्हणले जाते ज्यात पिझ्झा, बर्गर, वेफर्स, फ्रेंच फ्राईज अशा परदेशी पदार्थासाेबत आपले भारतीय वडापाव, सामाेसे, कचाेरी, मिसळ पाव,पाव भाजी ह्यांचा देखील समावेश हाेताे. वैज्ञानिकांच्या मते जंक फूड म्हणजे असा काेणताही अन्नपदार्थ, ज्यामध्ये कॅलरीज किंवा स्निग्धांश खूप जास्त प्रमाणात आहेत आणि प्राेटीन्स म्हणजे प्रथिनं, तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्व आणि क्षार यांचं प्रमाण मात्र अतिशय कमी आहे किंवा असे पदार्थ ज्यामध्ये मीठ, तेल यांचं प्रमाण त्यातल्या प्रथिनांपेक्षा खूप जास्त आहे.काही ठरावीक प्रमाणाबाहेर अशा प्रकारच्या अन्नाचं सेवन केलं तर आपल्या प्रकृतीवर त्याचा वाईट परिणाम हाेऊ शकताे, म्हणून अशा सर्व पदार्थाना जंक फूड म्हणतात.जंक फूड आपल्या सगळ्यांना आवडतं ते त्याच्या चवीमुळे परंतु त्याचे हाेणारे दुष्परिणाम आपण आपल्या चक्क मनाला समजून सांगितले तर जिभेवर संयम ठेवण्यासा मदत हाेईल. अनेक आई बाबा त्यांच्या मुला मुलींना पिझ्झा बर्गर खाण्यावरून रागवत असतात मात्र स्वत : वडा पाव, फरसाण ह्यावर ताव मारत असतात. असे हाेता कामा नये. खाण्याबाबत शिस्त आणि त्यातील समज ही घरात वाढायलाच हवी.एक नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या विचारांचा संबंध हा आपल्या भावभावनांशी आणि विचारांशी असताे. तुम्ही महिनाभर प्रयाेग करून पहा, जर तुम्ही महिनाभर घरातील ताजे आणि कमी तेल आणि मसाल्याचे जेवण केले तर तुम्हाला आतून शांत वाटेल आणि जर तुम्ही महिनाभर बाहेरचे खूप मसालेदार आणि तिखट जेवण केले तर तुमची खूप चिडचिड हाेईल. त्याचबराेबर जेवण करताना शांतपणे फक्त जेवण करावे. माेबाईल बघू नये, टीव्ही बघू नये किंवा चिडचिड करत जेवू नये, भरभर जेवू नये कारण आपण जे अन्न ग्रहण करताे त्यातून काय गुणवत्तेची उर्जा शरीरात तयार करावयाची हे केवळ आपल्याच हातात आहे. म्हणून जेवणाचे ताट समाेर आल्यावर त्या ताटाला कृतज्ञतेने नमस्कार करण्याची आपल्याकडे परंपरा आहे.