अन्न व औषध प्रशासनमंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी दिवाळीत स्वीट मार्ट, हाॅटेल्सची केली पाहणी

19 Nov 2020 11:41:32

nm,_1  H x W: 0 
 
बुलडाणा, 18 नाेव्हेंबर (वि.प्र.) : सध्या सणासुदीचे दिवस असून, बाजारात माेठी मिठाईची व फराळाची दुकाने लागली आहेत. या दुकानांमधून नागरिकांना शुद्ध व चांगली मिठाई व फराळ मिळताे का, याची तपासणी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी केली.बुलडाणा शहरातील संगम चाैक, जयस्तंभ चाैक, कारंजा चाैक, बाजार गल्लीतील 2 ते 15 खाद्यपदार्थांचे स्टाॅल व स्वीट मार्टची डाॅ. शिंगणे यांनी तपासणी केली.यात खाद्यपदार्थांवर निर्माण तारीख, खाण्यास याेग्य असल्याची तारीख, परवाना, खाद्यपदार्थ झाकून ठेवले आहेत किंवा नाही, पदार्थ बनवणारे कारागीर हातांची स्वछता राखतात की नाही, जेथे खाद्यपदार्थ बनवले जातात, तेथे स्वच्छता आहे की नाही याची तपासणी डाॅ. शिंगणे यांनी केली. ज्या दुकानदारांनी नियमांचे पालन केलेले नाही त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश डाॅ. शिंगणे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
 
Powered By Sangraha 9.0