शनिवार, रविवार माथेरानला आणखी 4 शटल सेवा सुरू

    19-Nov-2020
Total Views |

nhju_1  H x W:  
 
माथेरान, 18 (आ.प्र.) : अमन लाॅज ते माथेरानदरम्यान मध्य रेल्वेने शटल सेवा सुरू केली आहे. आता शनिवार आणि रविवार आणखी 4 (2 अप आणि 2 डाउन) शटलही सुरू करून मध्य रेल्वेने माथेरानवासीयांबराेबरच पर्यटकांनाही दिलासा दिला आहे. ही अतिरिक्त सेवा केवळ शनिवार आणि रविवारीच उपलब्ध असणार आहे.माथेरानहून सकाळी 10.20 आणि दुपारी 3.10, तर अमन लाॅजहून सकाळी 10.45 व 3.35 ला या शटल साेडल्या जातील. द्वितीय श्रेणीच्या 3, प्रथम श्रेणीची एक व 2 सामान व्हॅन, अशी या शटलची रचना असेल. काेराेना प्रतिबंधासाठीच्या सर्व नियमांचे पालन प्रवाशांना करावे लागेल, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.