वृषभ

    16-Nov-2020
Total Views |
या आठवड्यात तुम्हाला तुमची कामे पूर्ण करण्यासाठी पूर्ण जाेर लावावा लागेल.अशा मेहनतीमुळे, तसेच व्यक्तिमत्त्वामुळे नक्कीच तुम्हाला यश मिळेल. या आठवड्यात तुम्ही मित्रांच्या मदतीसाठी पुढे व्हाल. तुम्ही रात्री एकट्याने प्रवास करू नये. तुम्ही तुमच्या जाेडीदारासाेबत काही उत्तम क्षण घालवाल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुम्ही व्यवसायात संथ, पण स्थिरपणे पुढे जाल. यामुळे येत्या काळात तुम्हाला फायदा हाेईल. नव्या कामासाठी वा सध्याच्या कामाच्या विस्तारासाठी याेजना बनवाल. भागीदारीच्या कामात तुम्हाला भागीदाराची मदत हाेईल. नाेकरदारांची बदली हाेण्याची शक्यता  आहे.
 
नातीगाेती : या आठवड्यात प्राेफेशनल संबंधांत जवळीक वाढेल. सुरुवातीच्या काळात वडील व वरिष्ठांशी नरमाईचे धाेरण ठेवावे लागेल. वडिलांची खालावणारी तब्येत तुम्हाला त्रस्त करील. सार्वजनिक कार्यक्रमांत एखाद्या अनुरूप विरुद्धलिंगी व्यक्तीची भेट हाेण्याची शक्यता  आहे.
 
आराेग्य : या आठवड्यात उत्तम स्वास्थ्याचा आनंद घेऊ शकाल. काेणत्याही गंभीर आजाराची श्नयता दिसून येत नाही. तुम्ही उत्साही, उल्हासी राहाल.ज्यांना ऐकायला त्रास हाेताे त्यांची समस्या काहीशी वाढू शकते. कानदुखीचा त्रास हाेण्याची श्नयता आहे. तुम्ही आराम करायला हवा.
 
शुभदिनांक : 16, 21, 25
 
शुभरंग : भुरा, हिरवा, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात एखादा गैरसमज तुम्हाला सतावू शकताे. स्वत:च्या व्यवहाराबाबत गंभीर राहा. स्वत:कडे जास्त लक्ष द्या.
 
उपाय : श्रीगणेशाला दूर्वा व माेतीचूर लाडूंचा नैवेद्य दाखवून श्री लक्ष्मीसमाेर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. कधीही पैसा कमी पडणार नाही. राेज श्रीगणेशाची पूजा करून ॐ गं गणपतये नम:चा जप केल्यामुळे सर्व परीक्षांमध्ये यश मिळेल.