वृश्चिक

    16-Nov-2020
Total Views |
या आठवड्यात तुम्हाला सरमिसळ परिणाम मिळतील. तुम्ही इतरांचे लक्ष स्वत:कडे वेधून घेण्यात यशस्वी व्हाल. ऑफिसात तुम्ही तुमचे लक्ष्य वेळेत गाठू शकाल. यासाठी तुम्हाला कठाेर परिश्रम करावे लागतील. याकाळात तुम्ही प्रेम व्यक्त करू नका व भावुकही राहू नका.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात व्यावसायिक आघाडीवर काेणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नये. नाेकरीत वरिष्ठांचा हात तुमच्या डाे्नयावर असेल. प्रमाेशन हाेऊ शकते.व्यवसायात तुम्ही एखाद्या नव्या क्षेत्राकडे जाऊ शकता. धंद्याच्या विस्ताराचा, तसेच नवीन प्राॅड्नट लाँच करण्याचा हा काळ असू शकताे.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही राेमँटिक मूडमध्ये राहाल. भेटीगाठीसाठी सुरुवातीचा काळ कमी अनुकूल आहे. एका उत्तम जीवनसाथीचा शाेध या आठवड्यात पूर्ण हाेऊ शकताे. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित असाल तर प्रेम व्यक्त करण्यासाठी अनुकूल काळ आहे.
 
आराेग्य : या आठवड्यात तुमची प्रकृती सर्वसाधारणपणे ठीक दिसत आहे. घरात वा बाहेर आततायी हाेऊ नये. सुरुवातीच्या काळात चक्कर येणे, उजवा डाेळा जास्त दुखणे, स्नायूंमध्ये ताण, हाडे दुखणे असे त्रास हाेऊ शकतात. अग्नी आणि विजेपासून दूर राहावे. आईची तब्येत सुधारल्यामुळे तुमची चिंता कमी हाेईल.
 
शुभदिनांक : 17, 18, 19
 
शुभरंग : पिवळा, लाल, गुलाबी
 
शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
दक्षता : एखाद्या वादविवादामुळे जास्त पैसा खर्च हाेण्याची शक्यता .
 
उपाय : श्रीगणेशाचे पूजन करून गाईला गवत खाऊ घातल्यास सासूशी सुनेचे असलेले कटू वर्तन नाहीसे हाेईल. बुधवारी श्रीगणेश आराधना केल्यास बुधाचा ग्रहदाेष दूर हाेताे.