तूळ

    16-Nov-2020
Total Views |
या आठवड्यात तुम्ही शांतपणे व सबुरीने काम करावे. पूर्वीपासून तयार राहावे.कारण अचानक मार्गात एखादे नवे लक्ष्य येऊ शकते. इतरांशी घनिष्टता राखणे तुमच्यासाठी उत्तम असेल. याशिवाय ते तुमचे नातेसंबंधही वाढवतील. काेणत्याही वाद भांडणात पडू नये, अन्यथा तुमची मानहानी संभवते.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात तुम्हाला व्यावसायिक कामांमध्ये नीरसतेला सामाेरे जावे लागू शकते. टर्नओव्हरमध्ये नुकसान झाल्यामुळे तुम्हाला मालाच्या गुणवत्तेकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. सरकारी वा कायदेशीर कारणांमुळे तुमचे हाेत आलेले काम अडकून राहील.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही तुमच्या बाेलण्यावर ताबा ठेवायला हवा.तुमच्या बाेलण्याच्या स्थानी राहू असल्यामुळे कटुता वाढू शकते. याशिवाय प्रेमसंबंधातही तणाव वाढू शकताे. तुमच्या बाेलण्यातील बदलामुळे स्थिती थाेडी सुधारेल, पण संबंधात अद्यापही थाेडी कटुता राहील.
 
आराेग्य : या आठवड्यात अ‍ॅसिडिटी, रक्ताभिसरणाच्या समस्या वा स्नायुदुखी हाेऊ शकते. प्रवासात जास्त राेमँटिक हाेणे टाळावे. खेळाडू असणाऱ्यांना मार लागू शकताे. अखेरच्या दाेन दिवसांत विवाहितांना संततीविषयक मुद्यांमुळे चिंता वाटू शकते. सध्या खांदेदुखीची शक्यता  जास्त आहे.
 
शुभदिनांक : 16, 21, 28
 
शुभरंग : गुलाबी पिवळा, लाल
 
शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
दक्षता : या आठवड्यात काेणालाही पैसे उसने देऊ नयेत. विषम परिस्थितीत द्यावे लागले तर ते परत मिळण्याची आशा बाळगू नये.
 
उपाय : या आठवड्यात पिंपळाच्या झाडाला सात प्रकारची धान्ये वाहा व सरसू तेलाचा दिवा लावा. तीळाचे व उडदाचे पदार्थ गरिबांना दान करा.