सिंह

    16-Nov-2020
Total Views |
हा आठवडा तुम्हाला भावनिक आणि व्यावसायिक दाेन्ही रूपांत व्यग्र ठेवील.जुने दिवस आठवून तुम्ही भावुक हाेऊ शकता. आई-वडिलांचे मुलाशी नाते उत्तम हाेईल. तुमच्या प्रत्येक कामात मुलांकडून समर्थन मिळेल. तुम्ही जास्त भावनाविवश हाेऊ नये अन्यथा लाेक याचा फायदा करून घेतील.
 
नाेकरी/व्यवसाय : हा आठवडा व्यवसाय-नाेकरी करीत असलेल्यांना यश मिळू शकते. विशेषत: पर्यटनविषयक कामात व हाॅटेल व्यवसायात जास्त फायदा हाेऊ शकताे. भागीदारीच्या कामांमध्ये सावध राहावे. साैदेबाजी करताना दक्षता घ्यावी. स्थावर मालमत्तेबाबत फायदा-ताेटा पाहूनच पुढे जावे.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या बाेलण्यावर नियंत्रण ठेवावे व संभाषणात याेग्य शब्दांची निवड करावी, अन्यथा तुमच्या बाेलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकताे. दांपत्य जीवनात कुठे ना कुठे संघर्ष हाेण्याची श्नयता आहे. तुम्ही तुमच्या खास शैलीत प्रेम व्यक्त करू शकता.
 
आराेग्य : हा आठवडा आराेग्याच्या दृष्टीने काहीसा नरमगरम राहणारा आहे.मधल्या काळात तुमच्या मानसिक व्याकुळतेमुळे शारीरिक त्रास संभवताे. यांत्रिक व धाेकादायक कामे करणाऱ्यांना मार लागण्यापासून जपायला हवे. पाेटदुखीसाेबत पित्ताचा त्रास हाेऊ शकताे. आजारी पडण्याचीही शक्यता  आहे.
 
शुभदिनांक : 17, 18, 19
 
शुभरंग : गुलाबी, पिवळा, लाल
 
शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
दक्षता : या आठवड्यात तुम्ही शांतपणे व धीराने वागायला हवे. पूर्वतयारी ठेवावी. कारण अचानक एखादे नवे लक्ष्य समाेर येऊ शकते.
 
उपाय : श्रीगणेशाला बेसनलाडूचा नैवेद्य दाखवून व्यवसायस्थळी जावे व एखादे गाेड फळ एखाद्या मंदिरात वाहावे. यामुळे धन-धान्य, सुख-समृद्धी प्राप्त हाेईल.