हा आठवडा तुमच्यासाठी शानदार राहणार आहे. हा व्यवसाय व नाेकरीसाठी शुभ आहे. एखादा तुम्हाला गैरसमजात टाकू शकताे. तुम्ही स्वत:कडे जास्त लक्ष द्यायला हवे. क्षुल्लक समस्यांचा सामना करावा लागू शकताे. तुम्ही तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयी व्यवस्थित राखाव्यात.
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात कर्मचाऱ्यांना त्यांनी पूर्वी केलेल्या कामाचे फळ मिळेल. तुमच्या कामाची वरिष्ठ व सहकाऱ्यांकडून प्रशंसा हाेईल. तुम्ही तुमच्या क्षमतेच्या बळावर पगार वा जादा ओव्हरटाइम मागू शकता. जबाबदाऱ्यांसाेबत प्रगतीच्या श्नयता नाकारता येणार नाहीत.
नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही प्रणयाबाबत नरम-गरम राहाल. तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीकडे आकर्षित राहाल. यानंतर तुमच्यामध्ये कामुकतेची भावना जास्त राहील. तुम्ही जास्त विलासी राहाल. कामाच्या ठिकाणी संपर्क साधताना बाेलण्या-वागण्यावर नियंत्रण ठेवावे.
आराेग्य : या आठवड्यात तब्येतीकडे जास्त लक्ष द्यावे. एखाद्या गंभीर राेगाने ग्रस्त लाेकांनी बेपर्वा राहू नये. मशिनरीच्या कामाशी निगडित जातकांनाी काम करताना सावध राहावे. मानसिक व्याकुळतेला कुरघाेडी करू देऊ नये. माेसमी आजारांचा त्रास हाेण्याची शक्यता आहे.
शुभदिनांक : 16, 21, 23
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
दक्षता : या आठवड्यात भावनाविवश हाेऊ नये, अन्यथा लाेक तुमचा फायदा करून घेतील. त्याचा तुम्हाला त्रास संभवताे.
उपाय : या आठवड्यात दुकान वा व्यवसायाच्या ठिकाणी उद्घाटनावेळी चांदीच्या वाटीत धणे टाकून त्यात चांदीची लक्ष्मी-गणेशमूर्ती ठेवावी. ही वाटी पूर्वेला स्थापित करावी. दुकान उघडताच उदबत्तीने पूजा केल्यास व्यवसायात प्रगती हाेईल.