मेष

16 Nov 2020 12:52:57
या आठवड्यात व्यक्तिमत्त्व अत्तराप्रमाणे सुगंध पसरेल व सर्वांना आकर्षित करील. घाईगडबडीत गुंतवणूक करणे टाळावे. कुटुंबीयांची मदत हाेईल, पण त्यांच्या खूप साऱ्या मागण्या असतील. जीवनात एक नवे वळण येईल, जे प्रेमाला व प्रणयाला नवी दिशा देईल. काैटुंबिक जीवन उत्तम राहील.
 
नाेकरी/व्यवसाय : हा आठवडा व्यावसायिक व नाेकरदारांसाठी यश मिळवून देणारा असेल. विशेषत: पर्यटनविषयक कामात व हाॅटेल व्यवसायात जास्त फायदा हाेऊ शकताे. भागीदारीच्या कामांमध्ये सावध राहावे. साैदेबाजी करतानाही दक्षता घ्यावी. स्थावर मालमत्तेबाबत फायदा-ताेटा पाहूनच पुढे जावे.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही एकापेक्षा जास्त विरुद्धलिंगी व्यक्तींच्या संपर्कात राहाल. जाेडीदारासाेबतही तुमचे संबंध उत्तम राहतील. तसा तुमच्या संबंधात तणावही उत्पन्न हाेऊ शकताे. जुने मित्र व नातलग भेटीचा याेग आहे.कामाच्या ठिकाणी स्पर्धा करणे टाळावे.
 
आराेग्य : या आठवड्याच्या सुरुवातीला तुमची तब्येत काहीशी नरम-गरम राहील. मनाच्या उद्विग्न व क्राेधाच्या स्थितीवर अंकुश ठेवावा. पाेटाचे आजार, अपचन, गॅस इ. त्रास हाेण्याची श्नयता आहे. जाेडीदाराची वा संततीची तब्येत तुम्हाला त्रस्त करील. घाईगडबडीमुळे मार लागू शकताे.
 
शुभ दिनांक : 17, 18, 19
 
शुभरंग : गुलाबी, पिवळा, लाल
 
शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार दक्षता : या आठवड्यात वाद घालताना तिखट बाेलणे टाळावे.
 
उपाय : सकाळी श्रीगणेशाला पांढऱ्या दूर्वा अर्पण करून बाहेर पडावे. यामुळे कामात काेणताही अडथळा येणार नाही. घराच्या दारावर श्रीगणेशाचे चित्र अशाप्रकारे लावावे की, त्याचे मुख घरात असेल. यामुळे धनलाभ हाेईल.
Powered By Sangraha 9.0