या आठवड्यात तुम्ही तुमच्या जाेडीदारात दडलेले गुण कळल्यामुळे त्रस्त व्हाल. मित्र तुम्हाला तुमची कंपनी उत्तम असल्याची जाणीव करून देतील.ते तुमच्यासाेबत जास्त वेळ घालवतील. बिझनेस टूरमध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुम्ही तुमच्या तब्येतीचा विचार करणे गरजेचे आहे.
नाेकरी/व्यवसाय : व्यावसायिकबाबतीत विशेषत: शेअर बाजार, काॅमाेडिटी, ट्रेडिंग वा कमी काळाची खरेदी-विक्रीसंबंधित कामातील जातकांनी दक्षता बाळगावी. चुकीचा निर्णय एखादे माेठे आर्थिक नुकसान करू शकते.
नातीगाेती : या आठवड्यात नवीन संबंध जाेडताना खूप दक्षता बाळगा.सध्याच्या संबंधांतही परस्पर विश्वासाची कसाेटी लागू शकते. तुम्ही तुमच्या संभाषणकाैशल्याने नवे संबंध बनवू शकता. तुमच्या मित्रांचा परीघ वाढेल.
आराेग्य : या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्ही तब्येतीविषयी त्रस्त राहिलेले असाल. या त्रासाचे मूळ कारण आहे तुमची असंतुलित दिनचर्या आणि अकाली प्रवास करणे. यामुळे तुमच्यामध्ये थकवा उत्पन्न हाेईल. यामुळे आजार व त्रास वेगाने तुमच्यावर कुरघाेडी करू शकतात.
शुभदिनांक : 16, 21, 24
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
दक्षता : बाेलण्यावर ताबा ठेवावा. व किाेणत्याही भानगडीत पडू नये.
उपाय : श्रीगणेशाला बेसनलाडूचा नैवेद्य दाखवून व्यवसायस्थळी जावे व एखादे गाेड फळ एखाद्या मंदिरात वाहावे. यामुळे धन-धान्य, सुख-समृद्धी प्राप्त हाेईल.