या आठवड्यात तुमच्या घरी एखादे शुभकार्य हाेण्याची शक्यता आहे. कामावरून तुम्ही प्रदीर्घ सुटीही घेऊ शकता. नातलग वा एखादा जुना सहकारी तुम्हाला भेटायला येऊ शकताे. तुम्ही तुमच्या शेजाऱ्याशी भांडू नये.
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात प्राेफेशनल माेर्चावर विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागू शकताे. जर तुम्ही नाेकरी करीत असाल तर छुपे शत्रू व व्यवसाय करीत असाल तर प्रतिस्पर्धी तुमच्यावर कुरघाेडी करण्याचा प्रयत्न करू शकतात.
नातीगाेती : या आठवड्यात नवीन संबंध जाेडले जाण्याची श्नयता आहे. जुने लाेक व काही कारणांनी दूर गेलेले लाेक भेटू शकतात. जुने मतभेद दूर हाेतील. मित्रांशी भेटीगाठी हाेतील. त्यांच्यासाेबत जुन्या आठवणी ताज्या झाल्यामुळे मन प्रफुल्लित हाेईल.
सार्वजनिक जीवनात नवनवीन लाेकांचा परिचय हाेईल.
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य तुम्हाला दिलासा देणारे असेल. काेणत्याही जुनाट वा गंभीर आजाराची श्नयता नाही, पण पित्त वा गॅसचा त्रास हाेण्याची श्नयता आहे. अखेरच्या दिवसांत बद्धकाेष्ठता, दातदुखी, सांधेदुखी असा त्रास जाणवू शकताे.
शुभदिनांक : 16, 20, 21
शुभरंग : भुरा, हिरवा, निळा
शुभवार : साेमवार, मंगळवार, शनिवार
दक्षता : या आठवड्यात वरिष्ठांशी संबंध मधुर असतील, पण सहकर्मचाऱ्यांशी मतभेद व वाद हाेऊ शकताे. शत्रुपक्ष कुरघाेडी करू शकताे.
उपाय : गरीब बालक/बालिकेला दत्तक घ्यावे. त्यांना शिकवावे, कपडे, वह्यापुस्तके व खाण्या-पिण्याचा दाेन वर्षांचा खर्च केल्यास संतती हाेऊ शकते.