कर्क

    16-Nov-2020
Total Views |
या आठवड्यात स्वत:ला जास्त वेळ द्याल. नातलगांशी वाढलेला दुरावा कमी हाेईल. या आठवड्यात तुमच्या ऊर्जेत व क्षमतेत वाढ हाेईल. जाेडीदारासाेबत प्रेमळ वेळ घालवल्यामुळे हा आठवडा सुंदर हाेईल. प्रत्येक बदलासाेबत तुमचे वैयक्तिक संबंध सुधारतील. काेणाचेही समर्थन करू नका.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात व्यवसायात व करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळतील. कलाजगत, डिझाइन, जमिनीसंबंधित व्यवहार, कृषी व त्यासंबंधित उत्पादने, लाल रंगाच्या वस्तूंसंबंधित जातकांसाठी उत्तम काळ आहे. सट्टेबाजी व शेअरमध्ये फायदा हाेण्याची शक्यता  आहे.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुमचे प्रणयसंबंध सामान्य राहतील, पण तुम्हाला मनातल्या मनात फसगत वा विश्वासघात हाेण्याची भीती सतावत राहील.विवाहेच्छुकांनी याेग्य जाेडीदार निवडताना दक्ष राहायला हवे. प्रारंभी तुमच्यामध्ये भाेग-विलासाची प्रवृत्ती वाढेल. तुमचे मन शाश्वत प्रेमाला महत्त्व देईल.
 
आराेग्य : तुम्ही आराेग्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. आठवड्याच्या मध्यात तुमची स्थिती थाेडी सुधारेल व तुमच्यामध्ये नवी ऊर्जा संचारेल. पूर्वीपासून एखाद्या आजाराने त्रस्त असणाऱ्यांना उपचाराचा परिणाम उशिरा पाहायला मिळेल.ज्यांना खांदे, हाडे, स्नायू दुखण्याचा त्रास असेल त्यांनी जपावे.
 
शुभदिनांक : 17, 18, 19
 
शुभरंग : पिवळा, लाल, मरून
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात भांडणात पडू नये. यामुळे तुमचा अपमान हाेईल.कामावर सर्वश्रेष्ठ देण्याचा प्रयत्न करावा.
 
उपाय : श्रीगणेशाला राेज सकाळी लाडवाचा नैवेद्य दाखवल्यास धनलाभाचा मार्ग प्रशस्त हाेईल.