कन्या

    16-Nov-2020
Total Views |
या आठवड्याचा काळ तुमच्यासाठी शुभ आहे. जर तुम्ही गूढशास्त्राचा अभ्यास करीत असाल तर यात तुम्ही मनासारखे संशाेधनही करू शकता. तुम्ही मित्र व कुटुंबासाेबत एखाद्या रम्य ठिकाणी फिरायला जाऊ शकता, पण कामाची बंदिस्त वेळ तुम्हाला थाेडे त्रस्त करू शकते.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी बदलीचा याेग आहे. प्रायव्हेट नाेकरीत काम करणारे जातकही बदलीचा विचार करू शकतात. आकर्षक संधी चालून येतील. शेअर बाजाराशी संबंधित व्यक्तींनी दक्षतेने पुढे पावले टाकावीत.
 
नातीगाेती : या आठवड्यात प्रेमसंबंधात तुम्हाला अडथळ्यांना सामाेरे जावे लागेल. प्रेमींनी हुशारीने काम करण्याची गरज आहे. दांपत्य जीवनातही नाजूक संबंध हाेऊ शकतात. अहंकारामुळे संबंध विस्कटू शकतात. आई-वडील वा एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीशी वाद हाेऊ शकताे..
 
आराेग्य : या आठवड्यात तुमची तब्येत उत्तम राहील. तुमचे मन प्रफुल्लित राहील आणि मानसिक प्रसन्नतेमुळे तुमच्या शरीरातही जाेम आणि स्फूर्ती जाणवेल.
 
तुम्हाला तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये नियमितपणा आणायला हवा.आराेग्य सुधारण्यासाठी छाेट्या प्रवासाचे आयाेजन करण्याची शक्यता  आहे.
 
शुभदिनांक : 16, 21, 24
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : रविवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात तुम्हाला तुमचे काैशल्य उजळण्याची गरज आहे.तुमचा खर्च वाढेल. स्वत:वर नियंत्रण राखावे.
 
उपाय : या आठवड्यात सायंकाळी श्रीगणेशस्ताेत्र वाचावे व गायीला ताजे गवत वा भाजी खाण्यास द्यावी. बाधा दूर हाेतील.