धनु

    16-Nov-2020
Total Views |
या आठवड्यात मित्र व कुटुंबीयांसाेबत आनंदात क्षण घालवल्यामुळे हा आठवडा खूपच छान राहील. त्यांच्यासाेबत तुम्ही बाहेर फिरायलाही जाऊ शकता. मित्र व तुमच्यात गैरसमज निर्माण हाेऊ शकताे. त्यामुळे ज्यात आपल्याला संशय आहे अशी गाेष्ट बाेलू नये.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात व्यवसायात-करिअरमध्ये दक्षता बाळगावी.गुप्त शत्रू आपल्या कामांमध्ये विघ्न निर्माण करू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांची बाेलणीही खावी लागू शकतात. व्यावसायिकांना सरकारी अधिकाऱ्यांचा त्रास हाेऊ शकताे. नाेकरी शाेधणाऱ्यांना त्याचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात.
 
नातीगाेती : या आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात तुमच्या प्रिय व्यक्तीशी तुम्ही कम्युनिकेशनच्या विविध माध्यमांद्वारे संपर्कात राहाल, पण कामाच्या व्यापामुळे भेट हाेऊ शकणार नाही. कधी कधी संबंधात अहंकारामुळे वादाची स्थिती उद्भवू शकते.
प्रेमसंबंधाबाबत सावध राहावे.
 
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य उत्तम राहील. जाेडीदाराविषयीची व संततीविषयीची चिंता दूर झाल्यामुळे तुमचा मानसिक ताण कमी हाेईल. आठवड्याच्या मध्यात तब्येत थाेडी सांभाळायला हवी. तुमच्यामध्ये उत्साह दांडगा असेल, पण राेमांचकतेच्या नादात चुकीचे पाऊल टाकू नका.
 
शुभदिनांक : 17, 19, 21
 
शुभरंग : लाल, गुलाबी, पिवळा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात स्नेही व कुटुंबांशी उग्र वाद झाल्यामुळे दु:ख हाेऊ शकते.शक्यतो  हितशत्रूंपासून सावध राहावे.
 
उपाय : या आठवड्यात सुपारीवर कुंकू लावून त्याची गणपतीच्या रूपात स्थापना करून बाहेर जावे. कामात यश मिळेल.