अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील कर्टनी व्हाईट शिक्षिकेचा विद्यार्थ्यांकडून गाैरव
टे्नसास, 14 नाेव्हेंबर (वि.प्र.) : विद्यार्थी हाेमवर्कचा नेहमीच कंटाळा करतात. कारण त्यांना हाेमवर्क म्हणजे कटकट वाटते; पण अमेरिकेच्या टे्नसास येथील एक शिक्षिका कर्टनी व्हाईट ऊर्फ मिसेस व्हाईट विद्यार्थ्यांना कधीच हाेमवर्क देत नाही. त्यामुळे ही शिक्षिका विद्यार्थ्यांमध्ये अतिशय प्रिय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मिसेस व्हाइटला ‘टीचर ऑफ द इयर’ पुरस्कार देण्याची मागणी केली आहे.मिसेस व्हाईट टेक्सासमधील एका हायस्कूलमध्ये इंग्रजी विषय शिकवितात.या शिक्षिकेने आतापर्यंत कधीही हाेमवर्क दिला नाही. हाेमवर्क का देत नाही, याचा या शिक्षिकेने साेशल मीडियावर खुलासा केला आहे. 50 लाख अमेरिकनांनी मिसेस व्हाईटचा व्हिडिओ शेयर केला. 27 वर्षांच्या कर्टनी व्हाईट म्हणतात की, शैक्षणिक क्षेत्रात हाेमवर्क पद्धत अनेक वर्षांपासून प्रचलित आहे; पण अनेक शाळा व शिक्षकांना हाेमवर्कचे गांभीर्य नाही. केवळ पालन म्हणून ते विद्यार्थ्यांना हाेमवर्क देतात. याचा काहीही पुरावा नाही की, हाेमवर्क केले तरच विद्यार्थी हुशार हाेतात. विद्यार्थ्यांनी शाळेतच मन लावून अभ्यास केला तर घरी त्याची उजळणी म्हणजे हाेमवर्क करण्याची काहीही गरज नाही.मिसेस व्हाईट शिकवित असलेल्या हायस्कूलचे बहुतेक विद्यार्थी खेळ, एफएफएशी (फ्यूचर फार्मर्स ऑफ अमेरिका) संलग्न आहेत, तर बरेच विद्यार्थी पार्टटाईम जाॅब देखील करतात. त्यामुळे या मुलांना हाेमवर्क देऊन त्यांचा वेळ वाया घालविणे याेग्य नाही, असे मिसेस व्हाईट यांचे स्पष्ट मत आहे. कारण एकही विद्यार्थी मन:पूर्वक हाेमवर्क करीत नाही. त्यामुळे हाेमवर्क देण्याचा काय फायदा? मिसेस व्हाईट म्हणतात की, शाळा सुटल्यावर घरी जाऊन मुलांनी आराम करावा किंवा आपल्या आवडीचे काम करावे; पण बऱ्याच लाेकांना मिसेस व्हाईटचे असे करणे याेग्य वाटत नाही व ते मिसेस व्हाईटचा विराेध करतात. मिसेस व्हाईट चुकीची परंपरा प्रचलित करीत असल्याचा त्यांचा आराेप आहे. त्यामुळे मुलांच्या भवितव्यावर विपरीत परिणाम हाेऊ शकताे.