छाेट्या दाेस्तांनाे तुम्ही मल्लखांब हा क्रीडाप्रकार नक्कीच पाहिला असेल. कुस्ती खेळणाऱ्याना मल्ल म्हणतात. हे मल्ल आपली ताकद वाढवण्यासाठी व निरनिराळ्या डावपेचांचा सराव करण्यासाठी जमिनीत राेवलेल्या मजबूत खांबाचा उपयाेग करत असत.
चपळता , वेग वाढवण्यासाठी खांबावर निरनिराळ्या कसरतीही करत असत. यातूनच मल्लखांब हा क्रीडाप्रकार तयार झाला. मल्लखांब साधा व दाेन ते अडीच मीटर उंचीचा, शिसवी किंवा सागवानी लाकडाचा वरच्या दिशेने निमुळता हाेत जाणारा खांब असताे.त्याचे अंग,मान व बाेंड असे तीन भाग असतात. मल्लखांबावरचे मनाेरे रचणे हा एक अत्यंत साहसी प्रकार असताे. या मनाेरे बनवण्याच्या स्पर्धा देखील हाेतात. मल्लखांब शिकला असता साहसी वृत्ती वाढते. त्याचबराेबर यामुळे शरीर मजबूत आणि त्याच बराेबर लवचिक राहणारे सर्व व्यायामप्रकार ह्यात हाेत असल्यामुळे शरीराचे आराेग्य टिकून राहते.