एकदा एक मानववंशशास्त्रज्ञ वेगवेगळ्या मानवी समूह आणि जमाती यांचा अभ्यास करत हिंडत हाेता.त्याने जगभर प्रवास केला हाेता. त्यावरून त्याला विविध मानवी वंश, त्यांची भाैगाेलिक स्थिती आणि त्यानुसार त्यांचे वागणे याबद्दल त्याला माहिती कळत असे. या त्याच्या प्रवासात आणि अभ्यासात त्याला लहान मुलामुलींशी दाेस्ती करायला खूप आवडत असे.ताे त्यांची भाषा शिकत त्यांच्याशी गप्पा मारायचा आणि त्यांच्याशी खेळायचा देखील. एकदा ताे असाच अभ्यासाच्या निमित्ताने पाेहाेचला आफ्रिकेत. ती हाेती एक आफ्रिकन जमात. जंगलात राहणारी, शहरी जीवन आणि शहरी विकास याचा स्पर्श नसलेली. तर या जमातीचा अभ्यास करताना ताे असाच बसला हाेता. तेंव्हा त्याला तीन छाेटी मुले खेळताना दिसली. त्यांच्याशी बाेलावं असं त्याला वाटलं परंतु ते काही त्याच्याकडे येईना.मग त्याला एक कल्पना सुचली त्याच्याजवळ एक छाेटीशी बास्केट हाेती. त्यात त्यानं त्याच्याकडे असलेली सगळी फळे त्यात ठेवली मग ती बास्केट त्यानं त्याच्यापासून थाेड्या दूरच्या अंतरावर असलेल्या झाडाखाली ठेवली आणि ताे त्या छाेट्या तीन मुलांना हातवारे करून म्हणाला. खेळ खेळायचा का तुम्हाला? या तुमची ना स्पर्धा लावूया, धावण्याची स्पर्धा . जाे सगळ्यात पहिल्यांदा त्या बास्केट ठेवलेल्या झाडाजवळ पाेहाेचेल त्याला सगळी फळे मिळतील. मुलांना गंमत वाटली. ते खेळायला तयार झाले. टाळी वाजली की धावणं सुरू करायचं हाेतं.त्या तीनही छाेट्या मुलांनी काय केलं माहितीय, त्यांनी एकमेकांचे हात घट्ट धरले आणि टाळी वाजली तसे ते तिघेही एकमेकांचा हात पकडून धावले आणि त्यामुळे तिघेही एकदम साेबतच फळांच्या भरलेल्या त्या बास्केटपर्यंत पाेहाेचले आणि मस्तपैकी फळे खाऊ लागले. यावरून त्या मानववंशशास्त्रज्ञाला लक्षात आले, खरच आपण कशाला स्पर्धा लावताे आणि माणसांना एकमेकांच्या विरुद्ध उभे करताे. उलट एकमेकांना साेबत केली तर कष्टाचे गाेड फळ सगळ्यांना वाटून खाता येईल. थाेडक्यात मुला मुलीनाे तुम्हीही स्पर्धेला सुट्टी द्या आणि एकमेकांना आनंद द्या.