दिवाळीत खूप सारे फराळाचे पदार्थ तयार केले जातात. दिवाळीसाठी दुकानांत खूप पूर्वीच अनेक प्रकारच्या मिठाई तयार केली जातात. दिवाळीत जे घरी फराळाचे पदार्थ तयार करीत नाहीत ते हीच शिळी मिठाई खरेदी करतात. जी आराेग्याला घातक ठरू शकते. त्यामुळे दिवाळी सुखाने साजरी करायची असेल, तर ओव्हर इटिंग टाळा.
कमी खा, हेल्दी राहा : दिवाळीच्या आधीच सुरुवात करून भाऊबीजेपर्यंत लाेक खूप सारे खातात. ज्यामुळे त्याचे वजन त्वरित वाढते.खाताना नेहमी सावध राहावे. आपण काेणते पदार्थ किती खात आहाेत व त्यामुळे किती कॅलरी वाढू शकते ते पाहा. तळीव पदार्थ खातानाही पथ्य पाळायला हवे.चाॅकलेटपासून जरा दूरच : दिवाळीत गिफ्टमध्ये खूप सारे चाॅकलेटचे डबे मिळतात. जे हातातून सुटतच नाहीत. चाॅकलेट टाळण्याची उत्तम पद्धत हीच की, ते एखाद्या ड्राॅवरमध्ये वा कपाटात लपवून ठेवावीत. यामुळे आपणही चाॅकलेट खाणार नाही व घरातील इतरांनाही दूर ठेवू शकाल.
खाण्यासाठी छाेटी प्लेट : जर आपण माेठ्या प्लेटमध्ये खात असाल तर त्यामध्ये 150 कॅलरीज जास्त अॅड हाेतात, तसेच आपण आपल्या प्लेटमध्ये जेवढा जास्त पदार्थ असेल तेवढा जास्त खाल. यासाठी छाेटी प्लेट, वाटी व ग्लास वापरा. यामुळे कमी खाल्ले जाईल व वाढते वजनही राेखू शकाल. जर आपल्याला दिवाळीत अनेक जागी खावे लागत असेल तर नावापुरतेच खात राहावे.
घरची मिठाई खावी : बेसनलाडू, जिलेबी वा बर्फी इ. घरीच बनवून घ्या.ती फ्रेशही असेल व आपल्या तब्येतीचे नुकसानही करू शकणार नाही. घरची मिठाईही प्रमाणातच खायला हवी.
ड्रायफ्रूट घ्या : जेव्हा आपण फ्रेंड्सकडे जाल तेव्हा मिठाई वा केक घेण्यापेक्षा एक-दाेन पीस ड्रायफ्रूटच घ्या. ज्यामुळे कॅलरी व वजन वाढणे राेखू शकता.वेळेवर खा : जर आपल्या फ्रेंड्ससाेबत रात्रभर जागण्याचा प्लॅन केला असेल, तर डिनर लवकर करून घ्या. बऱ्याचदा लाेक रात्रभर स्नॅ्नस इ. खात राहतात व खाल्ल्यानंतर लगेच झाेपी जातात. असे अजिबात करू नका. कारण खाल्लेले पचायला खूप वेळ लागताे. यासाठी झाेपेच्या दाेन तास आधी डिनर करून घेणेच याेग्य असत