कर्जवसुलीच्या त्रासाला कंटाळून वाहतूकदारांचे आंदाेलन

    13-Nov-2020
Total Views |
 
m,kl_1  H x W:
 
पुणे, 12 नाेव्हेंबर (आ.प्र.) : लाॅकडाऊनच्या काळात वाहतूक बंद असल्यामुळे वाहतूकदारांना माेठा त्रास सहन करावा लागला. त्यांचा व्यवसाय अजूनही सुरळीत झालेला नाही. मात्र, त्यांनी घेतलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी बँका आणि खाजगी फायनान्स कंपन्या त्रास देत असल्याची तक्रार वाहतूकदार करत आहेत. याच त्रासाला कंटाळून वाहतूकदारांच्या वतीने बुधवारी (11 नाेव्हेंबर) आंदाेलन करण्यात आले.पुणे शहरातील रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक व मनसे वाहतूक सेना यांच्या वतीने हे आंदाेलन झाले. वाहतूकदारांना कर्जफेडीसाठी एक वर्षाचा माेरेटाेरियम मिळावा, अशी मागणी करण्यात आली. त्या अनुषंगाने फायनान्स कंपन्यांना पुन्हा एकदा स्मरणपत्र देण्यात आले. आरटीओ ऑफिसमध्ये निवेदन दिल्यानंतर आंदाेलकांनी एचडीएफसी बँक (बंडगार्डन), आयसीआयसीआय बँक (घाेले राेड), चाेलामंडलम कंपनी (प्रभात राेड), यांना निवेदन दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मालक-चालक व प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली. आंदाेलनात शहरातील वाहतूकदारांसाेबतच मनसे वाहतूक सेनेचे प्रमुख संजय नाईक आणि किरण देसाई उपस्थित हाेते.