मुंबई, 12 नाेव्हेंबर (आ.प्र.) : मिठी नदीपात्रातील क्रांतिनगर, संदेशनगर येथील बाधित झाेपडपट्टीधारकांना प्राधान्य देऊन त्यांचे त्वरित स्थलांतर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील झाेपडपट्ट्यांच्या स्थलांतराबाबत वर्षा निवासस्थानी बैठक घेण्यात आली. या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार अशाेक लांडे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवास, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजाेय मेहता, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, झाेपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लाेखंडे आदी उपस्थित हाेते. कुर्ला येथील बांधकाम माेकळ्या जागेत असून, तेथे 17200 घरे आहेत. त्यांपैकी काही घरे माेडकळीस आली आहेत किंवा जीर्ण झाली आहेत. तसेच, मिठी नदीपात्रात काही घरे आहेत.त्यांना प्राधान्य देऊन त्यांचे स्थलांतर करून इतर ठिकाणी त्यांना घरे बांधून देण्यात यावीत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.