राेज सकाळी अंडे-दही खा आणि दिवसभर तणावमुक्त राहा

    13-Nov-2020
Total Views |

nm7_1  H x W: 0 
 
वाॅशिंग्टन, 12 नाेव्हेंबर : मांसाहारी लाेकांनी सकाळी नाश्ता करताना पिवळ्या बलकासह एक तरी अंडे खावे, तर शाकाहारी लाेकांनी एक वाटीभर दही खावे, असा सल्ला अमेरिकन सायकाॅलाॅजिकल असाेसिएशनच्या शास्त्रज्ञ माया फेलर यांनी दिला आहे.
त्या म्हणाल्या की, अंडे, ओट्स आणि एव्हेकाडाे मध्ये व्हिटॅमिन बी-6 आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन -6 ‘फीलगुड’ सारखे हार्माेनचे उत्पादन वाढविते, तर मॅग्नेशियम तणावपूर्ण स्थितीचा सामना करण्याची क्षमता वाढविते. काही लाेक अंड्याचा पांढरा भाग खातात व पिवळा फेकून देतात; पण असे करू नये.अंड्याच्या पिवळ्या बलकात काेलीन आणि झिंक भरपूर प्रमाणात असते. हे दाेन्ही तत्त्व बेचैनी, चिडचिड आणि निराशा दूर करतात.अंड्याइतकेच दही उपयु्नत आहे. राेज सकाळी एक लहान वाटी दही नियमित खाल्ल्यास ताण नियंत्रित राहताे. दही आतड्यांमध्ये गुड बॅ्नटेरिया सेराेटाेनिन तयार करते. परंतु प्रत्येकाने फास्टफूड, शीतपेय श्नयताे टाळावे. कारण यामुळे कार्टिसाेल आणि अ‍ॅड्रेनालिन नावाच्या स्ट्रेस हार्माेनचा स्राव वाढताे, तर काॅफी, एनर्जी ड्रिंक, कॅफिन आणि कार्टिसाेलची निर्मिती वाढविते.त्यामुळे हृदयाचे ठाेके वाढण्याचा धाेका असताे. त्यामुळे मासे, भाजीपाला खाण्याला प्राधान्य द्यावे, असेही माया फेलर यांनी प्रतिपादन केले.