भूगाेलाची आवड असल्यास करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध

13 Nov 2020 13:12:30
 
m,8_1  H x W: 0
 
तुम्हाला भूगाेल आवडतं का? तर तुमच्यासाठी जिओग्राफर्स, जिओलाॅजिस्ट, हाईड्राेग्राफर, इन्ाॅर्मेशन टेक्नाेलाॅजीमध्ये विशेष ज्ञान मिळवून तुम्ही चांगलं करिअर करू शकता. जी.आई.एस.चं क्षेत्र आता खूप विस्तृत झालेलं आहे. ज्या अंतर्गत कारसाठी स्मार्ट गाइडंस सिस्टिम तयार करून उपग्रहांच्या सहाय्याने नैसर्गिक तेल स्राेतांना शाेधणे यांसारख्या कार्यांचा समावेश हाेताे.
एवढंच नाही तर हल्ली या विज्ञानाचा उपयाेग माेबाइल फोनमध्ये लाेकेशन आधारित अ‍ॅप्स तयार करण्यासाठी हाेताे.
दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचं तर, जी.आई.एस.चा उपयाेग आता वेगवेगळ्या उद्याेग आणि सेवांमध्ये व्यापकदृष्ट्या हाेऊ लागला आहे. याच्या वाढत्या उपयाेगाबराेबरच राेजगाराच्या संधीही वाढत आहेत. या क्षेत्रात सुरुवातीला पगार पंचवीस हजारांच्या आसपास असताे.
 
भविष्य
भाैगाेलिक आणि जनसांख्यिकीच्या दृष्टीने विविध तसंच वेगवेगळ्या नैसर्गिक स्त्राेतांनी संपन्न भारतासारख्या देशात जिओग्रािफकल इन्फोर्मशन सिस्टिम्सचं महत्त्व खूप अधिक आहे. हे एक शास्त्र आहे, ज्याद्वारे विशेष उपयुक्त असे नकाशे तयार केले जातात. प्रत्येक भागासाठी खूप बारकाव्यांसह संपूर्ण आकडे आणि नकाशे उपलब्ध असतात.
 
तज्ज्ञ काय म्हणतात?
जी.आय.एस. हा वेगवेगळ्या विषयांचा एक सुमेळ आहे, ज्याच्या अंतर्गत त्या विषयाच्या ज्ञानाचा वापर केला जाताे. यामध्ये सगळ्यात आधी जिओग्राी तसंच डेटा मॅनेजमेंट यासारख्या विषयांचा वापर केला जाताे. हे एक विशेषता प्राप्त झालेले क्षेत्र आहे.यामुळेच याचे फायदे पूर्णपणे सामान्य जनतेला उपलब्ध हाेऊ शकलेले नाहीत. याउलट हे खूप उपयुक्त आणि नियाेजन करण्यात अत्यंत महत्त्वपूर्ण तसंच सहाय्यक ठरू शकते.तज्ज्ञांच्या अनुमानानुसार, जी.आय.एस.कंपन्यांना प्रशिक्षित व्यक्तींची गरज माेठ्या प्रमाणात भासते. यामुळेच आता जी.आय.एस.शी संबंधित कमर्शियल अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर लक्ष्य आधारित मार्केटिंगसाठी जाेरात केला जाताे. यामध्ये हेल्थ केअर कंपन्यांचा समावेश आहे. ज्या जी.आई.एस. डेटाच्या मदतीने नकाशा तयार करून एखाद्या खास आजाराने ग्रस्त असणाऱ्या लाेकांचं ठिकाण ओळखू शकते. या तंत्राच्या मदतीनेच आता इलेक्शन कमिशन वाेटर रजिस्ट्रेशनला अधिक प्रभावीपणे पूर्ण करू शकते. कृषी उत्पादनाचे विश्लेषण, माल परिवहनावर नजर ठेवण्यासाठी कंपन्या या तंत्राचा खूप वापर करू लागल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0