नायडू रुग्णालयात 13 किलाे लिटरचा ऑक्सिजन टँक उभारणार

    11-Nov-2020
Total Views |
सर्व 150 बेडसाठी ऑक्सिजन सुविधा उपलब्ध हाेणार
 
m,8_1  H x W: 0
 
पुणे, 10 नाेव्हेंबर (आ.प्र.) : पुणे महानगरपालिकेच्या डाॅ. नायडू हाॅस्पिटलमधील सर्व 150 बेडवरील रुग्णांना आता पूर्णवेळ ऑक्सिजन सुविधा उपलब्ध हाेणार आहे. साेबतच व्हेंटिलेटरच्या रुग्णांनाही ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. यासाठी या रुग्णालयाच्या परिसरात 13 किलाे लिटरचा ऑक्सिजन टँक उभारण्यात येत आहे. यामध्ये गंभीर रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत, तसेच मृत्युदर शून्य करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. शहरात येत्या डिसेंबर आणि जानेवारीत काेराेनाचा दुसरा टप्पा येण्याची भीती असून, या काळात अत्यवस्थ रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग आणि ऑक्सिजन बेड वाढविण्याची सूचना केंद्रीय पथकाने दिल्या आहेत. त्याची गंभीरपणे दखल घेऊन महापालिकेने आता विविध उपाययाेजनांवर अंमल करण्याची सुरुवात केली आहे.काेराेनाच्या रुग्णांवर सुरुवातीच्या काळात उपचार करताना माेठ्या अडचणींचा सामना करावा लागला हाेता.ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळीत झाल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांची धावपळ झाली. या काळात चाकण आणि अन्य ठिकाणांहून ऑक्सिजन मागविण्यात आले. तरीही पुरेसा पुरवठा झाला नव्हता. सध्या या रुग्णालयात जम्बाे सिलिंडरच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा करण्यात येताे. परंतु, व्हेंटिलेटरवरील रुग्णांना अधिक ऑक्सिजनची गरज असल्याने चार तासांत सिलिंडर संपत हाेते. ते पुन्हा-पुन्हा भरावे लागत असल्याने रुग्ण व अधिकारीकर्मचाऱ्यांची गैरसाेय हाेत हाेती.