मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रयतकडून पावणेतीन काेटी

    11-Nov-2020
Total Views |

nm,8_1  H x W:  
 
मुंबई, 10 नाेव्हेंबर (आ.प्र.) : रयत शिक्षण संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीकाेव्हिड-19 साठी 2 काेटी 75 लाख 92 हजार 821 इतका निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांकडे निधीचा धनादेश सुपर्त केला. रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी या निधीसाठी त्यांचे एक दिवसाचे वेतन देऊ केले आहे. मुख्यमंत्र्यांनी रयतच्या शिक्षक व शिक्षकेतर सेवक आदींचे या याेगदानासाठी आभार मानले. काेराेनामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत अशा रीतीने एकत्र हाेणारा निधी गरजूंच्या उपचारांसाठी मदतीचा हात ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.