घटिकापात्र ते इलेक्ट्रोनिक; काळानुसार बदलत गेलेले घड्याळ

    08-Oct-2020
Total Views |
 
aesrhtjyk,u.io_1 &nb
 
सूर्य उगवताे आणि मावळताे. सूर्याची उन्हात सावली पडते. सकाळी ती एका बाजूला लांब असते. नंतर आखूड आखूड हाेत ती पायांखाली येते व नंतर ती दुसऱ्या बाजूने लांब हाेत जाते.हे हळूहळू माणसाच्या लक्षात आले व तेव्हापासून माणूस घड्याळ बनवू लागला. मानवाचे पहिले घड्याळ हे सावलीचे हाेते. यात सुधारणा हाेत हाेत ते ऋतूप्रमाणे वेळ दाखवणारे घड्याळ बनले. पण तरीही ढगाळ वातावरणात या घड्याळाचा उपयाेग हाेत नव्हता.भारतात घटिकाप्रमाणे वेळ माेजण्याची पद्धत पुरातनकाळापासून अंमलात आणली जात असे. घटिकापात्राच्या तळाला एक सूक्ष्म छिद्र असे. ते घटिकापात्र एका माेठ्या भांड्यात पाणी भरून त्यावर ठेवले जात असे. घटिकापात्रात हळूहळू पाणी शिरत जाऊन ते पूर्ण भरल्यावर बुडत असे.अशा प्रकारच्या घड्याळामुळे दिवसा किंवा रात्री वेळ माेजता यायची. या घटिकापात्रात आतल्या बाजूने खुणा राहत. त्याला पळे असे म्हणत.त्यानंतर वाळूची घड्याळे आली. या वाळूच्या घड्याळात दाेन भांडी एकमेकाला एका सूक्ष्म छिद्राने जाेडली जात. यांची ताेंडे बंद असत. वरच्या भांड्यातून वाळू गळून खालच्या भांड्यात यायची. नंतर हे भांडे उलटे केले की खालचे वर व्हायचे आणि वाळू पुन्हा खालच्या भांड्यात पडू लागायची.युराेपात बाराव्या शतकापासून कप्पे असलेली घड्याळे वापरायला सुरुवात झाली.स्वित्झर्लंडमध्ये दातेरी चक्राची घड्याळे बनविण्याची कला विकसित झाली. नंतर यंत्रे आणि इलेक्ट्रोनिक यंत्रणा वापरून आकडे दाखवणारी घड्याळे तयार करण्यात आली.ही घड्याळे मात्र अचूक वेळ दाखवतात.