मित्र मैत्रीणीनाे, तुम्हा सगळ्यांना सायकल चालवायला नक्कीच आवडत असेल. ह्या लाॅकडाऊनच्या काळात तुम्ही सायकल चालवणे नक्कीच मिस केले असेल. तुम्हाला आवडणाऱ्या ह्या सायकलची गाेष्ट तुम्हाला माहिती आहे का? सायकल या वाहनाच्या कल्पनेचे मूळ ज्याला म्हणता येईल असे वाहन एम. डी. सिव्हर्क या फ्रेंच गृहस्थांनी 1690 मध्ये प्रथम तयार केले. जर्मन बेराॅन कार्ल वाेन ड्रेसने ‘डँडी हाॅर्स’ नावाचं वाहन हे सायकलची प्राथमिक आवृत्ती असल्याचं म्हटलं जातं. स्टार्लेच्या कंपनीनेच 1885 मध्ये तयार केलेली सायकल जगातली पहिली आधुनिक सायकल समजली जाते. 1894 मध्ये खास माहिलांसाठीची सायकल तयार झाली रेसिंग सायकल, माउंटन सायकल, इलेक्ट्रिक सायकल असे सायकलींचे अनेक प्रकार आहेत. सायकलचं सगळ्यात माेठं वैशिष्ट्य म्हणजे ती चालवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं इंधन लागत नाही. त्यामुळे ती प्रदूषणही करत नाही. सायकल हे एकमेव असं वाहन आहे की, तुम्ही लहान वयातही ते चालवू शकता. कारण त्याला लायसन्स वगैरे लागत नाही. बाजारात तर आता किती तरी प्रकारच्या आणि वेगवेगळ्या वयाेगटासाठी उपयुक्त अश्या सायकली आलेल्या आहेत. सायकलिंगच्या अनेक स्पर्धादेखील चालवल्या जातात.
थाेडक्यात हवेवर चालणारी सायकल हवेसारखीच जाेरात पळवायला प्रत्येकाला मजा येतेच.