
अमृतपाण्यापासून अमृतमिट्टी तयार करण्याची एक स्वतंत्र पद्धत आहे.त्यामुळे तर झाडांची मुळे माेठ्या प्रमाणावर जमिनीत सर्व बाजूंनी पसरतात. रासायनिक खतात फक्त नायट्राेजन, पाेटॅश आणि फॉस्फरस हे घटक असतात तर या गाेआधारित खतात एकूण तीस घटक असतात.
महाराष्ट्रात आपण गेल्या पाच वर्षांत गायीचे शेण, मध आणि तूप यांच्या आधारे केलेल्या अमृतपाण्याचा उपयाेग पाहिला आहे. आज जवळजवळ पाच लाख एकरात महाराष्ट्रात अमृतपाणी पध्दतीची शेती केली जाते. देशभरात गाेआधारित शेतीच्या अनेक पध्दती आहेत. त्याची माहिती आपण केव्हा तरी घेऊच. पण झारखंडमधील बिरसा कृषि विद्यापीठातील संशाेधनाच्या आधारे अमृत मिट्टी म्हणजे अमृतमाती तयार करण्यात आली आहे.त्या विद्यापीठाने केलेल्या व्यापक संशाेधनामुळे त्याची उपयु्नतताही वाढली आहे. त्या विद्यापीठाचे प्रत्येक पिकानुसार अमृतमिट्टीचे स्वरूप भिन्न असले तरी त्याची मध्यवर्ती कल्पना अशी की, शंभर लिटर पाण्यात देशी गायीचे एक लिटर ताजे गाेमूत्र, ताजे एक किलाे शेण याशिवाय अर्धा किलाे गूळ आणि दहा, पंधरा केळी घालायची. ते मिश्रण निरनिराळ्या पध्दतीच्या पाचाेळ्यावर शिंपडायचे आणि सुकवायचे. अशी ही अमृतमिट्टी अनेक पिकांसाठी रासायनिक खतापेक्षाही प्रभावी खत म्हणून उपयाेगी पडते. ही पद्धती देण्याचे कारण असे की देशातील अधिकाधिक गाेआधारित शेतीपद्धती या शेतकऱ्यांपर्यंत पाेहाेचल्या पाहिजेत.यातील काेणतीही पद्धती चांगली किंवा चांगली नाही, असे म्हणायला वाव नाही. कारण प्रत्येक शेत आणि प्रत्येक पीक यानुसार ही पध्दती ठरत असते.आजपर्यंतच्या उपलब्ध माहितीच्या आधारे आपली अमृतपाणी पद्धती काेठेही कमी पडलेली नाही. पण प्रत्येक शेतकरी हा अधिकाधिक प्रयाेगशील हाेणे आवश्यक आहे. एका शेतात एका भागात एक पद्धत आणि दुसऱ्या बाजूला दुसरी असे करण्याने बिघडत नाही. किंवा दाेन एकर शेती असेल तर पाच गुंठ्याच्या तुकड्यात निराळे पीक आणि गाेआधारितचीही दुसरी पध्दती असेही करायला हरकत नाही.बिरसा कृषि विद्यापीठातील व्यवसाय नियाेजन विभाग प्रमुख डाॅ. सिध्दार्थ जयस्वाल यांनी सांगितले की, या अमृतपाणी पद्धतीत दहा किलाे शेण याऐवजी फक्त एक लिटर गाेमूत्र आणि एक किलाे शेण पुरते.पण त्यात गुळ, केळी, चिकूची फळे यांचा वापर असताे. एवढेच नव्हे तर या अमृतपाण्यापासून अमृतमिट्टी तयार करण्याची एक स्वतंत्र पद्धत आहे.त्यामुळे तर झाडांची मुळे माेठ्या प्रमाणावर जमिनीत सर्व बाजूंनी पसरतात.
रासायनिक खतात फक्त नायट्राेजन, पाेटॅश आणि फॉस्फरस हे घटक असतात तर या गाेआधारित खतात एकूण तीस घटक असतात.
माेरेश्वर जाेशी, 9881717855