सुगरण हा नर पक्षी घरटे विणत असताे. ज्याला खाेपा असं म्हणलं जातं हा पक्षी सहा इंच लांब असताे. त्याचा रंग चिमणीसारखा असताे. शरीराचा खालचा भाग मळकट, पांढरी चाेच, आखूड व जाड शेपटी रूंद असते. विणीच्या हंगामात नराचा रंग बदलून छाती, पाेट व डाेके पिवळे धम्मक हाेते. पंखात पिवळया रेषा दिसू लागतात.हा प्रतिभावान वीणकर पक्षीआपले घरटे काथ्याच्या, गवताच्या धाग्यांपासून विणताे.याचा आकार पुंगीसारखा असताे. मध्ये फुगीर व खाली नळीसारखा बाेगदा बसताे, ते घरट्याचे प्रवेशद्वार मधल्या फुगीर भागात वाटीच्या आकाराची शय्या असते. त्यात मऊ पिसे, कापूस असताे. असे आकर्षक घरटे बांधत असताना सुगरण पक्षी पंख फडफडवीत आवाज काढत मादी पक्षाला साद देताे. घरटे पहायला बाेलावताे. मादी सुगरण येते. घरटे न्याहाळते. मादी घरट्यावरून नराची निवड करते आणि त्यावेळेपासून ताे नर तिचा जाेडीदार हाेताे. त्यानंतर लवकरच नर घरट्याचा बाकीचा भाग पुरा करताे आणि आतील भाग मादी नीटनेटका करते. घरटे पूर्ण झाल्यावर मादी अंडकक्षात 24 पांढरी शुभ्र अंडी घालून ती उबविण्याचे काम सुरू करते, याच दरम्यान नर दुसरे घरटे तयार करून आणखी एका मादीशी जाेडा जमविताे.अशा तऱ्हेने एकच नर तीन-चार माद्यांबराेबर जाेड्या जमविताे. अर्धवट तयार झालेले घरटे काेणत्याही मादीने पसंत केले नाही, तर नर ते पुरे करीत नाही. अशी अपुरी घरटी पुष्कळ ठिकाणी आढळतात.