मित्र मैत्रिणींनाे, आपल्या महराष्ट्रात दुर्गम असे गडकिल्ले आहेत, ज्यात अहमदनगरमधील माळशेज घाटाच्या डावीकडे अत्यंत दिमाखात उभा असणारा अजस्त्र पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड हा एक हाेय. हरिश्चंद्रगडाला दाेन चार हजार वर्षांपूर्वीची पाैराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहुबाजूंनी नटलेल्या राैद्रभीषण कडेकपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्राचा उल्लेख प्राचीन अग्निपुराणात व मत्स्यपुराणात आढळताे. 174748 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी माेगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली. महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत तसेच साधारणपणे 12व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रीतील अत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. या किल्ल्यावर महादेवाचे सुंदर मंदिर आहे. केदारेश्वराची गुहा आहे, तारामती हे येथील सर्वात उंच शिखर आहे. काेकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात माेठे आकर्षण. काेकणकडा म्हणजे गिर्याराेहकांना आकर्षणाचे स्थान आहे. भाैगाेलिक व नैसर्गिक अनुकूलतेमुळे हरिश्चंद्रगडाच्या परिसरात जैविक विविधताही माेठ्या प्रमाणावर आहे. अशा ह्या सुंदर गडावर तुम्ही नक्की जा.