जागतिक तापमानवाढीचा फुलांवरही परिणाम

29 Oct 2020 13:11:50

n67_1  H x W: 0
 
हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीमुळे जगभरातील हवामानात आणि पर्यावरणामध्ये बदल जाणवत आहेत. पर्यावरणातील प्रत्येक घटकावर याचा परिणाम जाणवत आहे, मग ती झाडे असाेत, पक्षी असाेत वा प्राणी.तापमानवाढ आणि ओझाेन वायूच्या प्रमाणात घट हाेत असल्यामुळे बदललेल्या अतिनील किरणांच्या प्रमाणामुळे फुलांच्या रंगांमध्येही बदल झाला आहे. गेल्या 75 वर्षांच्या कालावधीत फुलांवर सूक्ष्म बदल हाेत असल्याचे संशाेधकांना दिसून आले आहे.तापमानवाढीमुळे अतिनील किरणांचे प्रमाणही बदलत आहे. हे किरण फुलांच्या पाकळ्यांपर्यंत पाेहाेचतात. पण त्यामध्ये फरक पडत असल्यामुळे हा बदल घडत असल्याचे संशाेधकांचे म्हणणे आहे. हे सूक्ष्म अतिनील रंगघटक मानवाला दिसत नाहीत; परंतु ते रंगघटक सृष्टीमध्ये परागीकरण घडवून आणण्यात माेलाचे काम करतात.दरम्यान, तापमानवाढीचा जसा फुलांवर परिणाम झाला आहे, तसाच परिणाम ज्वालामुखीवरही झाला आहे.अमेरिकेतील शास्त्रज्ञ कायला इयाकाेविनाे यांनी जिवंत ज्वालामुखीच्या स्फाेटशक्तीचा अभ्यास करण्यासाठी ज्वालामुखीच्या ठिकाणांचा, परिसराचा अभ्यास केला.ज्वालामुखीचा स्फाेट झाल्यानंतर त्यातून निघणारी ऊर्जा आसपासच्या परिसरातील घटक कसे बदलून टाकतात, याचे रहस्य त्याने स्पष्ट केले आहे.कायला यांनी या अभ्यासासाठी ज्वालामुखींची माॅडेल्सही उभी केलेली आहेत. ज्वालामुखीच्या स्फाेटानंतर त्यातून निघणाऱ्या ऊर्जेला समजून घेण्यासाठी कायला या जगभरातील ज्वालामुखींचे दगडही जमा करतात.
 
Powered By Sangraha 9.0