जायकवाडी धरणातून 49 दिवसांमध्ये 78 टीएमसी पाण्याचा विसर्ग

29 Oct 2020 13:31:47

b56_1  H x W: 0
 
पैठण, 28 ऑटाेबर (आ.प्र.) : जायकवाडी धरणातून गेल्या 49 दिवसांपासून विसर्ग करण्यात येत असून, या कालावधीत धरणातून आणखी एक धरण भरेल इतके पाणी साेडण्यात आले.जायकवाडीच्या इतिहासात 2006 मध्ये सर्वाधिक 102 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला हाेता. त्यानंतर यंदा आतापर्यंत 78 टीएमसी पाणी साेडण्यात आले असून, अद्याप धरणातून विसर्ग सुरू असल्याचे जायकवाडीचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले. यंदा 5 सप्टेंबरपासून धरणातून पाणी साेडण्यास प्रारंभ झाला. सतत 49 दिवस पाणी साेडण्याचा विक्रम यंदा झाला आहे. यापूर्वी धरणातून 15 ते 17 दिवस पाणी साेडल्याची नाेंद आहे.
विशेष म्हणजे यंदा धरणातून अद्यापही विसर्ग सुरू असून, विसर्ग आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. स्थानिक पाणलाेट क्षेत्रात जाेरदार पाऊस झाल्याने दाेन वेळेस धरण भरेल इतके पाणी जायकवाडीच्या स्थानिक पाणलाेट क्षेत्रातून दाखल झाले.
 
Powered By Sangraha 9.0