पुणे शहरात एक लाखांपेक्षा अधिक वाहनांची विक्री

    29-Oct-2020
Total Views |

v45_1  H x W: 0
 
पुणे, 28 ऑक्टाेबर (आ.प्र.) : सध्या अनलाॅकची प्रक्रिया सुरू असून, अर्थव्यवस्थाही हळूहळू पूर्वपदावर येत आहे. याकाळात अर्थव्यवस्थेला हात देणाऱ्या क्षेत्रांत ऑटाेमाेबाइल क्षेत्र आघाडीवर असून, लाॅकडाऊनच्या खंडानंतर वाहनांची खरेदी-विक्री जाेमाने सुरू झाली. यंदा पुण्यात एक लाख वाहन नाेंदणीचा आकडा नुकताच पार झाला असून सध्या दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाहन खरेदी-विक्रीत उत्साहाचे वातावरण आहे.पुणे, पिंपरी-चिंचवडला ऑटाेमाेबाइल हब म्हटले जाते. वाहननिर्मितीपासून वाहन विक्रीसाठी माेठी बाजारपेठ म्हणून ही दाेन्ही शहरे महत्त्वाची आहेत. या वर्षात देशभरात विकल्या गेलेल्या वाहनांपैकी सर्वाधिक वाहन विक्री झालेले पुणे हे सर्वांत वरच्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. मुंबई, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू आणि सर्वच राज्यांच्या राजधानीच्या शहरांपेक्षा, पुण्यात वाहनांची सर्वाधिक विक्री झाली. देशातील 1255 प्रादेशिक परिवहन कार्यालयांत एक जानेवारी ते 21 ऑक्टाेबर याकालावधीत एक काेटी 20 लाख वाहनांची नाेंद झाली. त्यात एक लाख वाहन नाेंदणीचा टप्पा ओलांडणारे पुणे आरटीओ देशातील एकमेव ठरले आहे. पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात 72 हजार वाहनांची नाेंदणी झाली आहे.गेल्या वर्षी 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर याकालावधीत एक लाख 14 हजार 333 नवीन वाहनांच्या विक्रीची आरटीओकडे नाेंद झाली हाेती. त्याद्वारे आरटीओला 360 काेटी सहा लाख 13 हजार रुपये महसूल प्राप्त झाला हाेता.यंदा लाॅकडाऊनमुळे मंदी आली असतानाही, 37105 नवीन वाहनांची विक्री झाली असून, त्याद्वारे 148 काेटी तीन लाख 54 हजार रुपये महसूल मिळाला आहे.