आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली

    29-Oct-2020
Total Views |
आयुष्यात राेज घडणाऱ्या छाेट्या छाेट्या गाेष्टींच्या माध्यमातूनच आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. ही गाेष्ट अनेक संशाेधनांतून अधाेरेखित झाली आहे. म्हणून यशासाठी सगळ्यात आधी आत्मचिंतन करणे आवश्यक आहे.
 
 
v45_1  H x W: 0
 
यशाच्या पायऱ्या चढूनच व्यक्ती यश प्राप्त करू शकते. म्हणून यशाच्या बाबतीत कधीच निराश हाेऊ नका. एकाच जागी बसून शांतपणे विचार करा. या जगात अशी काेणती व्यक्ती आहे, जिने कधीच हार पत्करली नाही, जिने कधी दुःख बघितलं नाही, जिच्या मार्गात कधीच काटे आले नाहीत. विचार केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, अशी काेणतीच व्यक्ती नाही.काहीजण छाेट्या छाेट्या समस्यांनी हारतात, पण काहीजण असेही असतात की, जे पुन्हा पुन्हा अपयश आल्यानंतरही आपली जिद्द साेडत नाहीत अशा व्यक्ती एक दिवस आपलं ध्येय गाठतातच. तुम्ही कधी लहान मुलांना चेंडू खेळताना बघितलं आहे, ते जेवढ्या जाेरात चेंडू खाली टाकतात, तेवढ्या जाेरात ताे उसळी मारताे. हे छाेटंसं निरीक्षण आपल्याला आयुष्यात खूप काही शिकवतं.हरण्याचा अर्थ असा हाेत नाही की, तुम्ही ते काम कधीच करू शकत नाही. याचा अर्थ असा की, तुम्ही जे काम केलं आहे त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी अजून वाव आहे. हे तुम्ही इतर प्रकारेही करू शकता. प्रत्येक अपयशातून काहीतरी शिका. तुमच्यातील कमतरतांना लिहा आणि त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करा. त्याच त्या चुका पुन्हा करणं टाळा. कधीकधी ाजील आत्मविश्वास आपल्या अंगलट येताे. आपल्याला असं वाटतं की, मला सगळं येतं, यामुळे आपण विशिष्ट कामाकडे ारसं लक्ष देत नाही. परिणाम असा हाेताे की, आपल्याला अपयशाचा सामना करावा लागताे. जर तुम्ही तुमचे शंभर टक्के दिलेत तर कदाचित दुसऱ्याने एकशे एक टक्के दिलेले असतील. त्यामुळे ताे यशस्वी हाेताे. यश आणि तुमच्यामध्ये एक टक्क्याचा फरक राहताे. या फरकाला नाहीसं करण्यासाठी या गाेष्टींची काळजी घ्या...